एरंडोलला अहिल्याबाई होळकर ज्येष्ठ नागरिक महिला संघाची स्थापना

एरंडोल – येथे नुकतीच अहिल्याबाई होळकर ज्येष्ठ नागरिक महिला संघाची सभा नुकतीच पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानी सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष तथा धुळे विभाग फेस्कॉम (धुळे, जळगावं, नंदूरबार जिल्हा) अरूण माळी होते. अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमापुजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. सानेगुरूजी लिखीत खरा तो एकचि धर्म ही प्रार्थना खैरनार मॅडम यांनी सादर केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अरूण माळी यांचा सत्कार जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा तथा माजी उपनगराध्यक्षा शकुंतला अहिरराव यांनी केला. संघाचे सचिव विनायक कुळकर्णी, उपाध्यक्ष जाधवराव जगताप, निंबा कुंभार यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. निंबा कुंभार लिखीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुस्तकाचे प्रकाशन देखील यावेळी करण्यात आले. सूत्रसंचलन शशिकला जगताप यांनी तर प्रास्ताविक शोभा साळी यांनी केले. यावेळी शकुंतला अहिरराव यांनी मनोगत व्यक्त करतांना सभासदांना उपस्थिती वाढविण्याची विनंती करून ज्येष्ठ महिला संघाचे महत्व काय आहे ? याबद्दल सांगितले. अध्यक्षस्थानावरून बोलतांना अरूण माळी यांनी ज्येष्ठ महिला संघाला वेळोवेळी सहकार्य करण्याचे सांगून संघाला मिळणार्या अनुदानाबद्दल माहिती दिली. आभार निवृत्त मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार यांनी मानले. याप्रसंगी माजी मुख्याध्यापिका अनुराधा पाटील, माजी नगराध्यक्षा आशा महाजन, सरिता रघुवंशी, शकुंतला पाटील, सुभद्रा पेंढारकर, शोभा पाटील, जिजाबाई पाटील, पुष्पा पाटील, लता पाटील, निर्मला पाटील, लिला वाणी, सुरेखा महाजन, पाटील ताई, भारती साळी आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नंदा शुक्ला, जैन भाभी, इंदिरा पाटील, वारूळे मॅडम, पाटील मॅडम, सुधा दुबे, मंगला पाटील यांचेसह महिला संघाच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.




