जळगावमहाराष्ट्रराजकारण

प्रभाग क्रमांक ४ मध्ये धनुष्यबाण कोणाच्या हाती?मयूर महाजन की कुणाल महाजन — शिवसेनेत उमेदवारीवर ताणतणाव!

एरंडोल (प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एरंडोलच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये “धनुष्यबाण” कोणाच्या हाती जाणार, यावर सध्या सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. शिवसेनेतून मयूर महाजन आणि कुणाल महाजन या दोघांच्या नावांची जोरदार चर्चा असून दोघेही तरुण, उत्साही आणि समाजकारणात सक्रिय म्हणून ओळखले जातात.

मयूर महाजन यांनी विविध सामाजिक उपक्रम, आरोग्य व क्रीडा क्षेत्रात काम करत तरुणांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. दुसरीकडे कुणाल महाजन हे नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करणारे आणि युवकांमध्ये लोकप्रिय चेहरे म्हणून उदयास आले आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत स्पर्धा चुरशीची झाली आहे.

शिवसेनेच्या गटांतर्फे दोन्ही उमेदवारांचे अर्ज पक्ष नेतृत्वाकडे पाठविण्यात आले असून अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या चर्चेनंतर होणार आहे. दरम्यान, कार्यकर्त्यांमध्ये पोस्टरबाजी आणि सोशल मीडियावर प्रचार सुरू झाल्याने या प्रभागात “महाजन विरुद्ध महाजन” ही लढत रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.दरम्यान या लढतीसाठी वरिष्ठांना फार डोक्याला ताण सहन करावा लागणार असुन जर का एखाद्याची उमेदवारी घोषित केली तर बंडखोरी होण्याची देखील भीती असल्याने वरिष्ठांना या लढतीसाठी फार कसरत करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button