ताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

हरकत घेतलेल्या मतदारांची नावे न वगळल्याने उपोषणाला बसणार असल्याचे विजय महाजन यांचे निवेदन.

प्रतिनिधी – एरंडोल येथील माजी नगरसेवक विजय महाजन यांनी प्रभाग क्रमांक ६ मधील काही मतदारांवर हरकत घेतली असताना देखील नगर पालिकेच्या कर्मचाऱ्याने कायम ठेवल्याने दि.७ नोव्हेंबर रोजी नगर पालिका कार्यालया समोर उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे.
        निवेदनात माजी नगरसेवक विजय महाजन यांनी एरंडोल नगर परिषद तर्फे एरंडोल नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक २०२५ ची प्राथमिक मतदार यादी प्रसिद्ध केली होती.यावेळी प्रभाग क्रमांक सहा मधील काही मतदार हे अन्य प्रभागात राहत असल्याने हरकत घेतली होती परंतु नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याने सदर यादीवरील मतदारांवर हरकत घेतली असताना देखील ती नावे कायम ठेवली असल्याचे म्हटले असून इतर हरकत दार यांनी देखील जे मतदार दुसऱ्या प्रभागात राहत असताना देखील नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला हाताशी धरुन संगनमताने त्यांची नावे  प्रभाग क्रमांक सहा मध्ये अंतिम यादीत नोंदवलेली असल्याचे म्हटले आहे तसेच याबाबत पाच नोव्हेंबर रोजी मुख्याधिकारी एरंडोल यांच्याकडे हरकत घेतली असून त्याच दिवशी दुपारी चार वाजता आपण बोलाविल्या मीटिंग मध्ये देखील सदर मुद्दा उपस्थित केला असता.मला समाधान कारक उत्तर मिळाले नाही तरी सदर प्रभाग क्रमांक सहा मध्ये जे मतदार येत नाही त्यांना वगळण्यात यावी अन्यथा सात नोव्हेंबर रोजी मी नगर परिषदेच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसणार असून माझ्या जीविताला बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली व नगर परिषद प्रशासनाची राहील असे म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button