जळगावमहाराष्ट्र

भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल नगरपरिषदेच्या नगर अध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीस उत्स्फूर्त प्रतिसाद.


प्रतिनिधी – एरंडोल येथे भारतीय जनता पार्टी तर्फे एरंडोल नगर परिषद नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या या प्रसंगी वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे,खासदार स्मिता वाघ,जळगाव ( पश्चिम )निवडणूक प्रमुख माननीय आमदार मंगेश चव्हाण, जळगाव ( पश्चिम ) जिल्हा अध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, ज्येष्ठ नेते माजी आमदार महेंद्रसिंग पाटील, भगवान महाजन,तालुका प्रमुख योगेश महाजन,सुनील भैया पाटील हे उपस्थित होते.
याप्रसंगी शहरातील १ ते ११ प्रभागातून प्रत्येकी आठ ते दहा उमेदवारांनी मुलाखती दिल्या व याप्रसंगी इच्छुक उमेदवारांनी असंख्य कार्यकर्ते सोबत आणून शक्ती प्रदर्शन केले तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी व सर्व तोला मोलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये आनंद,उत्साह व जोश निर्माण झाला व मुलाखतीस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button