जळगावदेश-विदेशमहाराष्ट्रराजकारण

एरंडोल नगर परिषद निवडणुकीसाठी आज रोजी ३ नगराध्यक्ष तर २३ नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल.

प्रतिनिधी – एरंडोल नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ प्रक्रियेच्या  शेवटचा एक दिवस शिल्लक असताना रविवार दि. १६ नोव्हेंबर रोजी २० नगरसेवक पदासाठी तर ३ नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांचे नामनिर्देशन प्राप्त झाले. गेल्या ६ दिवसांत २ नगराध्यक्ष पदासाठी तर १० नामनिर्देशन अर्ज नगरसेवक पदासाठी प्राप्त झाले होते. मात्र आज नगराध्यक्ष पदासाठी तिन नामनिर्देशन पत्र दाखल झाले असून २० नामनिर्देशनपत्र नगरसेवक पदासाठी दाखल झाले आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. १६/११/२०२५ रोजी नगराध्यक्ष पदासाठी रघुनाथ राजराम महाजन,गीतांजली नरेंद्र ठाकूर व नरेंद्र धुडकू ठाकूर यांचे ३ नामनिर्देशन पत्र तर नगरसेवक पदासाठी अनिल केशव महाजन व क्षमा नयन आरखे यांचे दोन अर्ज तर पठाण नय्यमखा दलशेरखा,सुनिता रुपेश माळी, कृष्णा प्रल्हाद ओतारी,श्रद्धा विशाल वंजारी,पौर्णिमा महेश देवरे,सैय्यद शबाना बी नुरुद्दीन, कागजी नजमा बी सईद,कागदी नसीमाबी शहाबुद्दीन,सैय्यद इमरान अली जाफरअली,सत्यभामा बाई माधव पाटील,अजय साहेबराव महाजन,गीतांजली नरेंद्र ठाकूर,प्रतिभा दिनकर पाटील,सीताबाई वासुदेव गायकवाड,ईश्वर युवराज बिऱ्हाडे,प्रमोद राजेंद्र महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
        दरम्यान आज सकाळी शहरातील मरीमाता मंदिर येथून महायुतीच्या भाजपाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकूर यांच्या सोबत नगरसेवकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत नामनिर्देशन पत्र दाखल केले.याप्रसंगीआमदार अमोल पाटील,जिल्हाध्यक्ष डॉ.राधेश्याम चौधरी,शिवसेना जिल्हा युवा सेना प्रमुख प्रा.मनोज पाटील,भाजपा तालुकाध्यक्ष योगेश महाजन,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,जिल्हाध्यक्ष वासुदेव पाटील, जि. प.सदस्य नानाभाऊ महाजन,जगदीश पाटील,समाधान पाटील,बबलु चौधरी,माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील,रविंद्र जाधव असंख्य महायुतीचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button