जळगावमहाराष्ट्र

एरंडोल नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 अंतर्गत पथनाट्यामार्फत मतदानाचे महत्त्व सादरीकरण.

   प्रतिनिधी- आगामी निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर, SVEEP (सिस्टिमॅटिक व्होटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन)कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीचा एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला.दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी एरंडोल नगरपरिषद आणि समर्थ बहुउद्देशीय संस्था, जवखेडे यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात पथनाट्याचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. मतदारांना त्यांच्या हक्कांबद्दल आणि मतदानाचे लोकशाहीतील महत्त्व समजावून सांगणे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता.शहरातील प्रमुख ठिकाणी व सर्वाधिक वर्दळीच्या ठिकाणी या पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले.ज्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत मतदानाची जाणीव पोहोचली.

यावेळी बसस्थानक परिसर,म्हसावद नाका परिसर,बुधवार दरवाजा परिसर,जुनी नगरपालिका परिसर या सर्व ठिकाणी नागरिकांनी पथनाट्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदानाचे महत्त्व जाणून घेतले.
सदर जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदिप पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्यधिकारी, नगरपरिषद एरंडोल अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
पथनाट्य यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी स्वीप कक्षाचे नोडल अधिकारी तथा पुरवठा निरीक्षण अधिकारी विवेक वैराळकर यांच्यासह सहाय्यक प्रकल्प अधिकारी महेंद्र पाटील,सहाय्यक कृषी अधिकारी,सचिन पाटील, भूकर मापक दीपक बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी, लोकशाहीच्या या उत्सवात नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन १०० टक्के मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी प्रदिप पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button