जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे निवडणूक प्रशिक्षणास अधिकारी–कर्मचाऱ्यांची शंभर टक्के उपस्थिती

प्रतिनिधी एरंडोल – आगामी निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर एरंडोल येथे आयोजित करण्यात आलेले द्वितीय निवडणूक प्रशिक्षण अत्यंत उत्साहात पार पडले. हे प्रशिक्षण चौधरी मंगल कार्यालयात घेण्यात आले असून प्रशासनाच्या निर्देशानुसार सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थिती लावली.

निवडणुकीसाठी एरंडोल तालुक्यात एकूण २३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापैकी या द्वितीय प्रशिक्षणासाठी १८४ कर्मचाऱ्यांची उपस्थिती शंभर टक्के नोंदविण्यात आली. दरम्यान, ४६ कर्मचाऱ्यांना या टप्प्यात प्रशिक्षण नव्हते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप पाटील, अमोल बागुल सहायक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी यांनी दिली.
निवडणुकीच्या सुरळीत व काटेकोर कामकाजासाठी प्रशासनाने ८ टीम राखीव ठेवलेल्या आहेत. तसेच एरंडोल तालुक्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या ३८ असून सर्व केंद्रांसाठी आवश्यक नियोजनाची माहिती प्रशिक्षणात देण्यात आली.

निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि व्यवस्थित पार पाडण्यासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरले असून कर्मचारी व अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या उपस्थितीचे प्रशासनाने कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button