* श्री साई गजानन संस्थान तर्फे ६ डिसेंबर रोजी एरंडोल ते शेगांव पायी वारीचे प्रस्थान……..!*

प्रतिनिधी एरंडोल – येथील श्री साई गजानन संस्थान तर्फे एरंडोल ते शेगांव पायी वारीचे सालाबादप्रमाणे ६ डिसेंबर २०२५ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.या पायी वारीचे ३५ वर्षांची परंपरा यंदाही कायम राखण्यात आलेली आहे.श्री साई बाबा व श्री गजानन महाराजांच्या मुर्त्या एकाच मंदिरात असलेले हे तीर्थक्षेत्र नावारूपाला आले आहे.विशेष म्हणजे एरंडोल पासून शेगांव व शिर्डी हे जवळपास समान अंतरावर आहेत. हे या तीर्थक्षेत्राचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.दरवर्षाप्रमाणे यंदाही या पायी वारीत शेकडो भाविक सहभागी होणार आहेत.असे संस्थानचे अध्यक्ष बापू मोरे सर यांनी सांगितले.
पुर्वी या वारीत १२०० पर्यंत वारकरी सहभागी व्हायचे परंतु अमळनेर, शिरसोली, म्हसावद या गावांच्या वारकऱ्यांनी वेगळी वारी तयार केल्यापासून या वारीत जवळपास ३ वर्षांपासून या वारीमध्ये ४०० ते ५०० वारकरी भक्तीभावाने हजेरी लावतात.ही वारी ६ दिवसांची असते.दररोज रात्री संत्संग केल्याशिवाय वारकरी झोपत नाहीत.पहाटे लवकर उठून सत्संग करतात.या वारीत केवळ एरंडोलचेच नव्हे तर पुणे, मुंबई, नाशिक व अनेक खेड्यापाड्यावरून वारकरी येऊन सहभागी होतात.इच्छुक वारकऱ्यांनी यंदाच्या वारीत सहभाग घ्यावा.असे आवाहन करण्यात आले आहे.




