जळगावमहाराष्ट्र

*गुजरहद्द शिवारासह एरंडोल तालुक्यात चक्रीय वादळामुळे कोसळलेल्या शेती पंप खांब उभारणीच्या कामाचे ६ महिन्यांपासून भिजत घोंगडे, वीजपुरवठ्या अभावी रब्बी पेरण्या धोक्यात…………!*

*प्रतिनिधी एरंडोल – येथे गुजरहद्द शिवारासह तालुक्यात ११ जुन २०२५ रोजी चक्रीय वादळ सदृश्य पावसामुळे शेतीपंप खांब जमीनदोस्त झाले होते.६ महिने उलटले तरी सुद्धा शेतीपंप खांब उभारणीचे काम अजूनही थंड बस्त्यात आहे.त्यामुळे रब्बी पेरण्या कशा कराव्यात असे संकट शेतकऱ्यांपुढे उभे ठाकले आहे.
       चक्रीय वादळ सदृश्य अवकाळी पावसामुळे एरंडोल तालुक्यात मोठा तडाखा महावितरणला बसला होता.अनेक ठिकाणी उच्च दाब व लघुदाब वाहीन्यांचे खांब कोसळून पडले होते. ‘ सरकारी काम आणि १२ महिने थांब ‘ या उक्तीप्रमाणे या घटनेला ६ महिने झाले तरी सुद्धा विजवितरण यंत्रणा कुंभकर्णी निद्रा घेत आहे.त्यामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत.याबाबत शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.युध्दपातळीवरून विद्यूत खांबांचे काम तात्काळ करावे.अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.अन्यथा शेतकरी विज वितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button