जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

जागतिक दिव्यांग दिना ‘ निमित्ताने तालुक्यातील खर्ची येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष प्रशासकीय महा-शिबिर उत्साहात संपन्न……!*

प्रतिनिधी एरंडोल जागतिक दिव्यांग दिनाच्या अनुषंगाने, तालुक्यातील एकाही दिव्यांग व्यक्तीला शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये या उदात्त उद्देशाने एरंडोल तालुका प्रशासनाने खर्ची, खु. ता. एरंडोल येथे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एका विशेष प्रशासकीय महा-शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.संजय गांधी योजनेचे नायब तहसीलदार अमोल बन यांच्या मूळ विचारधारेला उपविभागीय अधिकारी मनीषकुमार गायकवाड आणि तहसीलदार प्रदीप पाटील याच्या मार्गदर्शनाखाली सदर महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
      या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने आणि तत्परतेने मिळवून देणे हा होता.खर्ची, रवंजा, खेडी, कडोली, रिंगणगाव, दापोरी, सावदे, विखरण, चोरटकी, खडके, खेडगाव आदी विविध गावांतील दिव्यांग बांधव-भगिनींनी या कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
        शिबिरात दोन प्रमुख कार्ये तातडीने पूर्ण करण्यात आली.ऑनलाईन माहिती (डेटा) अपलोड म्हणजेच शासन निर्णयानुसार पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना दरमहा २,५०० रूपये इतके अनुदान थेट त्यांच्या बँक खात्यावर ( डि बी टी प्रणाली ) जमा व्हावे यासाठी लागणारी आवश्यक माहिती ऑनलाईन पोर्टलवर तात्काळ अपलोड करण्यात आली.तसेच दुसरे म्हणजे नवीन अर्ज भरणे. ज्या लाभार्थ्यांना आजपर्यंत संजय गांधी निराधार योजनेच्या दिव्यांग लाभ योजनेचा लाभ मिळालेला नव्हता त्यांच्यासाठी शिबिरातच नवीन अर्ज भरून घेण्यात आले.त्याचप्रमाणे संबंधित सी एस सी चालकांच्या सहकार्याने हे अर्ज तात्काळ ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आले.यामुळे लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळण्याचा मार्ग लवकरच मोकळा झाला आहे.
       या एकात्मिक कॅम्पमुळे दिव्यांग बांधव-भगिनींसाठी शासकीय कामकाज अधिक सोयीस्कर झाले. प्रशासनाच्या या तत्परतेबद्दल आणि संवेदनशीलता दाखवल्याबद्दल लाभार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर समाधान आणि कृतज्ञता व्यक्त केली.
       हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रशासनाच्या या सक्रिय भूमिकेमुळे दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्याची प्रक्रिया अतिशय वेगवान झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button