नेहा पाटील हिस बी.ए.एम.एस. परीक्षेत प्रथम श्रेणी.

प्रतिनिधी – एरंडोल येथील नेहा ईश्वर पाटील हिने राजीव गांधी युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस, कर्नाटक येथे घेतलेल्या बी.ए.एम.एस.आयुर्वेद शास्त्राच्या पदवी परीक्षेत प्रथम श्रेणी मिळवत यशाची प्रभावी घोडदौड कायम ठेवली आहे.वर्ष २०२५ मधील निकालात नेहाने उत्तम गुण मिळवत विद्यापीठात आपली वेगळी छाप उमटवली असून तिच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.नेहा एरंडोल येथील ईश्वर पाटील यांची कन्या असून ते कॉम्प्युटर सेंटर चे संचालक आहे.
नेहाने सातत्यपूर्ण अभ्यास, चिकाटी आणि आयुर्वेद क्षेत्रातील प्रगाढ आवड याच्या जोरावर हे यश मिळवल्याचे तिच्या सहाध्यायी व प्राध्यापकांनी नमूद केले आहे. आधुनिक वैद्यकासोबत आयुर्वेदातील प्राचीन ज्ञानाचा समन्वय साधत तिने शैक्षणिक क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केल्याची प्रशंसा करण्यात येत आहे. यशाबद्दल प्रतिक्रिया देताना नेहाने सांगितले की, “हे यश माझ्या आई-वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे पाठबळ आणि माझ्या कष्टांचे फलित आहे. पुढे आयुर्वेद क्षेत्रात संशोधन व सेवा या दोन माध्यमांतून समाजासाठी कार्य करण्याची इच्छा आहे.”
कु. नेहा पाटीलच्या या गुणवत्तापूर्ण यशाबद्दल तिच्या परिवारात, मित्रपरिवारात व गावात आनंदाचे वातावरण असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




