एरंडोलला सूर्योदय दिनदर्शिकाचे प्रकाशन संपन्न
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या भविष्यात नक्कीच मार्गी लावू-लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर

एरंडोल (प्रतिनिधी) – येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघातर्फे दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर आणि नगरसेविका डॉ. गीतांजली ठाकूर यांचे हस्ते संस्थेच्या सभागृहात करण्यात आले.संस्थेचे अध्यक्ष तथा निवृत्त तहसीलदार अरुण माळी, सचिव विनायक कुलकर्णी यांचेसह संचालक मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अरुण माळी होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव विनायक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास सभासद बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. नरेंद्र ठाकूर यांनी मनोगतात, मी या संस्थेशी पंधरा वर्षापासून संपर्कात आहे त्यामुळे मी आपल्या समस्या समजू शकतो. त्या समस्या भविष्यात तालुक्याचे आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्फत नक्कीच मार्गी लावेल. आपल्या ज्येष्ठांच्या आशीर्वादानेच आम्ही एकाच वेळी दोघे पती-पत्नी या पदापर्यंत लोकसेवेसाठीच पोहोचलो आहोत असे भावनिक आवाहन केले .त्याचवेळी र्डीर्पीीीश लेारिपू मुंबई, जळगाव येथील आर. एल. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव येथील तज्ञ डॉक्टरांनी जेष्ठांची बीपी, शुगर ची मोफत तपासणी केली. त्यात 121 ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. संस्थेचे जेष्ठ सभासद योगराज देवरे यांनी त्यांचे वाढदिवसानिमित्त उपस्थित सभासदांना स्नेह भोजन दिले. डिसेंबर 2025 मधील 20 जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस संस्थेतर्फे साजरे करण्यात आले. वाढदिवसानिमित्त जगन्नाथ महाजन यांनी संस्थेस देणगी दिली. यशस्वीतेसाठी संस्थेचे उपाध्यक्ष जाधवराव जगताप, जेष्ठ संचालक प्रा. शिवाजीराव अहिरराव, पी. जी. चौधरी सर, वसंतराव पाटील, विश्वनाथ पाटील, नामदेवराव पाटील, भगवान महाजन, सुरेश देशमुख, जगन महाजन, सुपडू शिंपी, गणेश पाटील, निंबा बडगुजर, भागवत पाटील, निंबा कुंभार, सुभाष दर्शे, डॉ. अमृत के. पाटील, पंडित महाजन, एन . डी. पाटील, डी. एस. पाटील सर, नाना मिस्त्री, साहेबराव पाटील, वसंत देशमुख, वामनराव माळी, जगदीश साळी, अशोक वंजारी, रमेश माळी, निवृत्त नायब तहसीलदार भीमसिंह जाधव, सुरेश पारखे, अशोक महाजन, भास्कर कोळी, रामदासशेठ पिंगळे, जगन्नाथ तेली सर, गुलाबराव पवार यांचेसह सभासद बांधव उपस्थित होते.




