जळगावमहाराष्ट्र

माय-बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर याची परतफेड करण्यासाठी प्रत्येक निर्णयात ‘जनहित प्रथम’ हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून काम करा – आमदार अमोलदादा पाटील

एरंडोल – नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत माय-बाप जनतेने दिलेल्या ऐतिहासिक कौलानंतर आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा आमदार मा.अमोलदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, भाजपा नेते ॲड.किशोरजी काळकर, युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक तथा गटनेते प्रा.मनोजभाऊ पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर, धरणगांव बाजार समितीचे मा.सभापती शालिकभाऊ गायकवाड, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, भाजपा युवामोर्चा पदाधिकारी भैरवीताई पलांडे, खडके येथील जगदीशदादा पाटील, मा.नगरसेवक डॉ.एन.डी.पाटील, भाजपाचे एस.आर.पाटील, मा.जि.प.सदस्य नानाभाऊ महाजन, जयश्रीताई पाटील, शहरप्रमुख बबलूदादा चौधरी यांचेसह नवनिर्वाचित नगरसेवक, नगरसेविका, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी सदस्य, महायुतीचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते, एरंडोल शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    एरंडोल नगरपरिषदेच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आपणा सर्वांसमोर उभा राहताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एरंडोलच्या सुज्ञ मतदारांनी दिलेला हा ऐतिहासिक कौल म्हणजे विकासाला, प्रामाणिकपणाला आणि पारदर्शक कारभाराला मिळालेली भक्कम साथ आहे.या निवडणुकीत जनतेने केवळ प्रतिनिधी निवडले नाहीत, तर एरंडोलच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्पष्ट दिशा दिली आहे. मी सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ही जबाबदारी मोठी आहे—आणि त्याहून मोठी आहे जनतेची अपेक्षा. नगरपरिषद म्हणजे केवळ प्रशासकीय संस्था नाही, तर ती शहराच्या विकासाची प्रयोगशाळा असते. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण, प्रकाश व्यवस्था, उद्याने, व्यापारी सुविधा—या सर्व बाबींमध्ये लोकाभिमुख आणि दर्जेदार काम झाले पाहिजे. प्रत्येक निर्णयात ‘जनहित प्रथम’ हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून काम करा. आजपासून आपण सर्वांनी एकसंघपणे एरंडोलच्या विकासासाठी काम करण्याची गरज आहे. नगरपरिषदेचा कारभार पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि नागरिकांना विश्वास देणारा असला पाहिजे. योजनांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तेने झाली पाहिजे—हीच जनतेची अपेक्षा आम्ही नक्कीच पूर्ण करण्याचा विश्वास आज या एरंडोलच्या माय-बाप जनतेला देत असल्याचे आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button