क्रीडाजळगावमहाराष्ट्र

श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा.


एरंडोल  प्रतिनिधी – यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे क्रीडा सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांमधील शारीरिक तंदुरुस्ती, सांघिक भावना व क्रीडास्पर्धेची आवड वाढविण्याच्या उद्देशाने विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रीडा सप्ताहात लंगडी जंप, थ्रो बॉल, लिंबू-चमचा, रनिंग, लांब उडी, क्रिकेट, खो-खो, कॅरम अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांदरम्यान विद्यार्थ्यांनी क्रीडावृत्ती, शिस्त व कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री. अमितदादा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सोपान साळुंखे, प्रा. संजीव कुमार व श्री. आनंदराव पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्या विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सौ. प्रिती बियाणी यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. किरण महाजन सरांनी केले. यावेळी शाळेचे प्राचार्य दीनानाथ पाटील सर, शेखर पाटील सर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रीडा सप्ताहामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, खेळाडूवृत्ती व संघभावना वृद्धिंगत झाल्याचे समाधान व्यक्त करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button