जामनेरच्या जिल्हा ग्रामीण युवा साहित्य संमेलनात कवी प्रवीण महाजन यांच्या कवितेला मिळाला वन्स मोअर

विशेष प्रतिनिधी – एरंडोल येथील राष्ट्रीय साहित्य संघाचे संयोजक प्रवीण आधार महाजन यांच्या चला पुस्तक वाचूया या कवितेला दोनदा म्हणण्याची संधी लाभत वन्स मोअर मिळाला. व्यासपीठावर संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक व समीक्षक प्रा.डॉ. फुला बागुल, जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष तथा संयोजक डी डी पाटील, ज्येष्ठ साहित्यिक प्रा बी एन चौधरी, प्रा.डॉ. एस आर महाजन, प्रा. मंगला महाजन, निवृत्त मुख्याध्यापक प्रतिभा नरवाडे, निवृत्त मुख्याध्यापक डी एस चौधरी,सचिव गोरक्ष सूर्यवंशी आणि उपस्थित होते. यावेळी कवी महाजन यांच्या कवितेचे उपस्थित मान्यवर विद्यार्थ्यांनी कौतुक करत उत्तम प्रतिसाद दिला. मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व जामनेर तालुका साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सदर संमेलन संपन्न झाले. यावेळी उत्तर महाराष्ट्रातून अनेक नामवंत साहित्यिक व लेखक यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी प्रवीण महाजन यांचा प्रा. डॉ. फुला बागुल यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व गौरव पत्र देऊन यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जामनेरच्या आई हॉस्पिटलच्या संचालिका डॉ मोनाली महाजन तर आभार प्रतिभा नरवाडे यांनी मानले.




