स्वामी विवेकानंदाची १६३ सावी जयंती निमित्त रक्तदान , रक्तदानास उस्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी – स्वामी विवेकानंदाची १६३ वी जयंती, वंदेमातरम राष्ट्रगीताची १५० वी जयंती व योगेश्वर नागरी सहकारी पतपेढीचा ३५ वा वर्धापन दिन या निमित्ताने विवेकानंद केंद्र -एरंडोल, योगेश्वर नागरी सह. पतसंस्था -एरंडोल व माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्र -जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. २११ जणांनी रक्तदान केले.सदर शिबिरास एरंडोल नगरपालिकेचे नवनिर्वाचित उच्चशिक्षित नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, नगरपालिकेचे उच्चशिक्षित नगरसेवक व शिवसेनेचे एरंडोल शहराचे किंगमेकर प्रा. मनोज पाटील (पेहेलवान),एरंडोल गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल पाटील,नगरवाचनालयाचे अध्यक्ष जगदीश ठाकूर यांनी उपस्थिती देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवीला. रक्तदात्यामध्ये प्रमुख माऊली हास्पिटलचे डॉ. मुकेश चौधरी व सौ. डॉ. प्रीती चौधरी, प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. सुयश पाटील, गणेश हॉस्पिटलचे डॉ. राहुल पाटील, मोरया डेंटल हॉस्पिटलचे डॉ. मकरंद पिंगळे व सौ. डॉ. राधिका पिंगळे, एरंडोलचे प्रसिद्ध उद्योजक राहुल तिवारी, सामाजिक कार्यकर्ते नरेंद्रसिंग पाटील, एरंडोल फार्मसी असोसिएशन चे अध्यक्ष सतिश पाटील व त्यांचे सर्व फार्मसी असोसिएशन चे सहकारी,नवनिर्वाचित तरुण नगरसेवक नितेश चौधरी व मयूर महाजन, एरंडोल शिवसेना प्रमुख व नगरसेविका पती अतुल मराठे, बुलडाणा अर्बन को-ऑप. बँकेचे मॅनेजर योगेश पाटील व त्यांचे सहकारी,अनेक व्यापारी, वकील, सामाजिक कार्यकर्ते, तरुण पुरुष व महिलांनी मोठया संख्येने रक्तदानासाठी उपस्थिती दिली.
सदर रक्तदान शिबिरासाठी अनेकांनी मदत केली. विशेषतः निवृत्त प्राध्यापक, विवेकानंद केंद्राचे संस्थापक व योगेश्वर नागरी पतसंस्थेचे चेअरमन प्रा. जी. आर. महाजन सर, विवेकानंद केंद्राचे प्रमुख कार्यकर्ते व निवृत्त शिक्षक नरेश डागा सर, विवेकानंद केंद्राचे प्रसाद दंडवते, स्वीकृत -सेवाभावी नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील, धूत सर,योगेश्वर नागरीचे संचालक प्रकाश पाटील, गोपाळ महाजन, ईश्वर पाटील, कुंदन बडगुजर, सौ. वंदना कुलकर्णी,तसेच मॅनेजर मंगेश पाटील, कॅशियर दिपक पाटील, पिग्मी प्रतिनिधी जितेंद्र पाटील, राजेंद्र पाटील कासोद्याचे सेवाभावी डॉक्टर पांडुरंग पिंगळे, एरंडोल चे परोपकारी व्यक्तिमत्व शैलेश सुभाष पाटील या सर्वांनी विशेष परिश्रम घेतले.
जळगाव येथील माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तकेंद्राचे प्रमुख भानुदासजी येवलेकर यांचे विशेष सहकार्य होते. रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी डॉ. मकरंद वैद्य, सुनील पाटील, उज्वला पाटील,जागृती लोहार, रामचंद्र पोतदार, श्रीकांत मुंडले, करण तिवारी, संजय कोळी यांचा सहभाग होता.
विवेकानंद केंद्राचे वतीने प्रत्येक रक्तदात्याला २०२६ ची डायरी तसेच माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्त केंद्र जळगाव कडून प्रत्येकाला रक्तदानाचे गौरवपत्र व वंदेमातरम या राष्ट्रगीताच्या १५० साव्या जयंती निमित्त सुंदर सन्मानचिन्ह देण्यात आले.




