प्रजासत्ताक दिनानिमित्त एरंडोलला विविध कार्यक्रम.

एरंडोल-शहरातील विविध सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. शैक्षणिक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयाच्या पटांगणावर प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रांताधिकारी मनीषकुमार गायकवाड यांचेहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी पोलीस,गृहरक्षक दलाच्या जवानांनी तसे एन.सी.सी., आर.एस.पीच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले.कार्यक्रमास आमदार अमोल पाटील,नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर,तहसीलदार गोपाल पाटील,मुख्याधिकारी अमोल बागुल,गटविकास अधिकारी दादाजी जाधव,पोलीस
निरीक्षक निलेश गायकवाड,माजी नगराध्यक्ष देविदास महाजन,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शरद काबरे,नगरसेवक
डॉ.नरेंद्र पाटील,जगदीश ठाकूर,ईश्वर बि-हाडे,संभाजी पाटील यांचेसह विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी,शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नगरपालिका कार्यालय.
येथील नगरपालिका कार्यालयात उपनगराध्यक्षा सुनीता माळी यांचे हस्ते तर शंभर फुट ध्वजस्तंभ येथे नगराध्यक्ष डॉ.नरेंद्र ठाकूर यांचेहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल,उपनगराध्यक्षा सुनिता माळी, युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील, नगरसेवक अनिल महाजन,मयूर महाजन,नितेश चौधरी,अमोल तंबोली,छाया दाभाडे,कल्पना पाटील, रवींद्र महाजन,आरती महाजन, डॉ.नरेंद्र पाटील,योगेश महाजन,पौर्णिमा देवरे, डॉ.गितांजली ठाकूर,कृष्णा ओतारी यांचेसह आजीमाजी नगरसेवक, नगरसेविका व कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हा परिषद शाळा नांदखुर्द.
नांदखुर्द (ता.एरंडोल) येथील जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील तर ग्रामपंचायत कार्यालयात निवृत्त मेजर दिलीप पाटील यांचे हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.यावेळी मुख्याध्यापिका सिमा पाटील यांनी शाळेच्या विकासासाठी
सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांनी सुमारे दीड लाख रुपयांची देणगी जाहीर केली.यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने शाळेला देण्यात आलेल्या शुद्ध पेयजल मशीनचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण
करण्यात आले.विरार येथील माया फाउंडेशनच्यावतीने विद्यार्थ्याना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका सिमा पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रेमचंद अहिरराव यांनी सुत्रसंचलन केले.धनराज भामरे यांनी आभार
मानले.कार्यक्रमास सरपंच मनीषा पाटील,केंद्रप्रमुख प्रभाकर पाटील यांचेसह उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.
सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघ.
येथील सूर्योदय ज्येष्ठ नागरिक संघात संघाचे सचिव विनायक कुलकर्णी यांचेहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष अरुण माळी, उपाध्यक्ष जाधवराव जगताप, प्रा.शिवाजीराव अहिरराव,भगवान महाजन,विश्वनाथ पाटील, पी.जी.चौधरी,गुलाबराव पवार यांचेसह संघाचे सभासद, ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
न्यू इंग्लिश मिडियम स्कूल.
येथील एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित न्यू इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संस्थेचे संचालक अनिल बिर्ला यांचेहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.कार्यक्रमास चेअरमन डॉ.नितीन राठी,यश मणियार,परेश बिर्ला,धीरज काबरा,प्राचार्य हॅरी
जॉन यांचेसह संस्थेचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
रा.ति.काबरे विद्यालय.
येथील रामनाथ तिलोकचंद काबरे विद्यालयात संस्थेचे सचिव राजीव मणियार यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभप्रजासत्ताक दिनानिमित्त एरंडोलला विविध कार्यक्रम.देशभक्तीपर गीतांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.मुख्याध्यापक सुनील राठ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शरद काबरे,सहसचिव धीरज काबरा,शालेय समितीचे चेअरमन अनिल बिर्ला,डॉ.नितीन राठी,परेश बिर्ला,यश मणियार,गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन,नगराध्यक्ष
डॉ.नरेंद्र ठाकूर,उपनगराध्यक्षा सुनीता माळी,रा.हि.जाजू प्राथमिक विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका जयश्री कुलकर्णी यांचेसह संस्थेचे पदाधिकारी,शिक्षक व पालक उपस्थित होते.
संघवी आंतरराष्ट्रीय विद्यालयात नौदल जवानाच्या हस्ते ध्वजवंदन.
उत्राण (ता.एरंडोल) येथी सत्यशोधक महात्मा फुले शिक्षण संस्था संचालित सुरेशचंद बी.संघवी आंतरराष्ट्रीय शाळेत नौदलाचे जवान हेमराज बोरसे यांचेहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी राष्ट्र
गीत,झेंडा गीत व महाराष्ट्र गीत सादर केले.संस्थेचे अध्यक्ष देवमन माळी अध्यक्षस्थानी होते.संस्थेतर्फे अनेक वर्षांपासून जवानाच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात येत असल्याबद्दल उपस्थित आजी माजी जवानांसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या गीतावरील नृत्य कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.यावेळी शालेय वर्षात विविध स्प्रधांमध्ये यश प्राप्त करणा-या विद्यार्थ्यांचा बक्षिस देवून गौरव करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष देवमन माळी,प्राचार्या वैशाली पंडित,जवान हेमराज बोरसे यांनी स्वदेशी बनावटीची विमानवाहू नौका, राफेल,सुखोई,मीराज याबाबत विद्यार्थ्याना माहिती दिली. शाळेतील कलाशिक्षक राहुल सोनवणे यांनी केलेली सजावट व फलक लेखन यांचे सर्वांनी कौतुक केले.गणेश महाजन यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.महेश कचरे व हीना
शेख यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष देवमन माळी,सचिव शितल माळी,निवासी वैद्यकीय अधिकारी दर्शना जाधव यांचेसह शिक्षक,शिक्षकेतर
कर्मचारी,पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.
गोपी गोल्ड इंग्लिश मेडियम स्कूल.
येथील ग्रामीण उन्नती मंडळ संचालित गोपीगोल्ड इंग्लिश मेडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ॲड.मोहन शुक्ला यांचेहस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी टाटा
निबंध स्पर्धेत यश प्राप्त करणा-या विद्यार्थ्याना बक्षिस वाटप करण्यात आले.शाळेतील नर्सरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य तर दहावीच्या विद्यार्थ्यांनी संगीत कवायत सादर केली.यावेळी सद्स्थेचे अध्यक्ष सचिन विसपुते,advt.मोहन शुक्ला,प्राचार्य
सुनील ठाकरे यांनी मनोगत व्यक्त केले.वैशाली बोरसे यांनी सुत्रसंचलन केले.चैताली महाजन यांनी आभार मानले. उपप्राचार्या ज्योती वडगावकर यांचेसह शिक्षकांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.




