जळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

जळगावात रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त भव्य हेल्मेट रॅली.

प्रतिनिधी जळगाव –  शहरात सुरू असलेल्या ‘रस्ता सुरक्षा सप्ताह २०२६’ अंतर्गत आज जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे भव्य दुचाकी हेल्मेट रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्यात आली.
मा. श्री. डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक, जळगाव यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत सुरक्षित प्रवासाचा आणि हेल्मेट वापराचा प्रभावी संदेश देण्यात आला. आज सायंकाळी सुमारे ४.०० वाजता पोलिस मुख्यालयातून या रॅलीला सुरुवात झाली.
या रॅलीमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सुमारे १६० पोलीस अंमलदार आपल्या दुचाकी वाहनांसह सहभागी झाले होते. विशेष म्हणजे, रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्याने हेल्मेट परिधान करून ‘आधी स्वतः शिस्त, मग इतरांना धडा’ असा आदर्श नागरिकांसमोर ठेवला.
रॅलीचा मार्ग
पोलीस मुख्यालय येथून मा. पोलीस अधीक्षक श्री. डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीला प्रारंभ झाला. ही रॅली आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, गाडगे बाबा चौक मार्गे जात महाबळ चौक येथे समाप्त झाली. संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध पद्धतीने जाणाऱ्या या पोलीस ताफ्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.
उद्देश
रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण कमी करणे, दुचाकी वाहन चालवताना हेल्मेट वापर अनिवार्य असल्याचे महत्त्व पटवून देणे आणि सुरक्षित वाहनचालनेबाबत जनजागृती करणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
जिल्हा पोलीस दलाच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून, रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश समाजात पोहोचल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button