३५ पेक्षा अधिक समाजांना सामाजिक सभागृहांतून हक्काचे व्यासपीठ – आमदार मा. अमोलदादा पाटील

एरंडोल – आमदार अमोल पाटील यांच्या ६ फेब्रुवारी रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज एरंडोल शहरात विविध विकासात्मक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आ. अमोल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या एरंडोल शहरातील विविध गणेश मंडळांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच एरंडोल नगरपरिषदेच्या वतीने आयोजित शालेय स्पर्धांमधील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
एरंडोल शहरातील कुंभार, राजपूत, मराठे, शिंपी, सैय्यद, ब्राह्मण, चौधरी, पांचाळ, बडगुजर, साळी, लोहार, मनियार, पाटील, कागदी आदी समाजांसाठी सामाजिक सभागृहांची उभारणी, पाताळनगरी हनुमान मंदिर, आठवडे बाजार हनुमान मंदिर, श्री विठ्ठल मंदिर, दक्षिणमुखी हनुमान मंदिर, श्री महादेव मंदिर (जहांगीरपुरा) येथे सभामंडप बांधकाम, साई गजानन मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविणे तसेच फकीरवाडा व संविधान भवन येथे सामाजिक सभागृहांची कामे लोकार्पित करण्यात आली.
यासोबतच एरंडोल शहरात मटण मार्केट बांधकाम (५ कोटी रुपये), रस्ता खडीकरण (२० लक्ष), सामाजिक सभागृह (३० लक्ष), चर्मकार समाज सभागृह (३० लक्ष) व पेंढ्या मांग समाज सभागृह (२० लक्ष) या विकासकामांचे भूमिपूजनही करण्यात आले. तसेच एरंडोल नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ.छायाताई आनंद दाभाडे यांचे तर्फे लाडक्या बहीनींना साड्या वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मरीमाता चौक मित्र मंडळ व श्री.आनंदभाऊ दाभाडे मित्र परिवारतर्फे आमदार मा.अमोलदादा पाटील यांची लाडू तुला कार्यक्रम करण्यात आला.
एरंडोल नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.सुनिता रूपेश माळी, नगरसेविक अनिल केशव महाजन, नगरसेवक मयुर दिलीप महाजन, नगरसेविका सौ.आरती अतुल महाजन, नगरसेवक योगेश युवराज देवरे, नगरसेवक रविंद्र संतोष महाजन यांचे तर्फे सत्कार सोहळा व हळदी कुंकू कार्यक्रम यानंतर संत सावता माळी मढी पंच मंडळ, नागोबा मढी पंच मंडळ, बालाजी मढी पंच मंडळ, श्री सावता माळी व्यायाम शाळा, बालवीर गणेश मित्र मंडळ, शिवराज गणेश मित्र मंडळ, जय सावता मित्र मंडळ, श्रीकृष्णा गणेश मित्र मंडळ, मारोती मढी पंच मंडळ, देशमुख मढी पंच मंडळ, नागराज गणेश मित्र मंडळ, जय बालाजी मित्र मंडळ, नम्रता गणेश मित्र मंडळ, ओमसाई गणेश मित्र मंडळ, संकटमोचन मित्र मंडळ या मंडळांचा वतीने आमदार मा.अमोलदादा पाटील यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना आ.अमोलदादा पाटील म्हणाले की, “आज केवळ घोषणा नाही तर प्रत्यक्षात उभ्या राहिलेल्या विकासकामांचे लोकार्पण होत आहे. विकासाच्या या व्हिजनवर विश्वास ठेवून माय-बाप जनतेने आम्हाला विधानसभा व नगरपरिषद निवडणुकांत विक्रमी मताधिक्य दिले. त्या विश्वासाला प्रत्यक्ष कृतीतून न्याय देण्याचे धोरण आम्ही अंगीकारले आहे.”
“आजवर एरंडोल शहरातील ३५ पेक्षा अधिक लहान-मोठ्या समाजांना सामाजिक सभागृहांच्या माध्यमातून एकत्र येण्यासाठी, विचार मांडण्यासाठी व सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे हाच माझ्या समाजकारणाचा उद्देश आहे, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमास सन्माननीय लोकनियुक्त नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, आजी-माजी पदाधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, शिवसैनिक, विविध समाजांचे प्रतिनिधी व मोठ्या संख्येने शहरवासी उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार मा.अमोलदादा पाटील यांनी संयोजकांचे आभार मानले.




