जळगावमहाराष्ट्र

शासन आपल्या दारी’ अंतर्गत डिजिटल हयात प्रमाणिकरण शिबिर संपन्न..

एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल शहरातील प्रभाग क्रमांक ११ मधील कागदीपुरा परिसरात “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी डिजिटल हयात प्रमाणिकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, संजय गांधी निराधार योजना तसेच दिव्यांग योजनेच्या लाभार्थ्यांचे डिजिटल हयात प्रमाणिकरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक, निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना शासकीय कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज भासली नाही. प्रशासनाने त्यांच्या दारात जाऊन सेवा उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी उपस्थित लाभार्थ्यांचे ऑनलाईन हयात प्रमाणिकरण करून घेण्यात आले तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहितीही नागरिकांना देण्यात आली.
शिबिराच्या वेळी नायब तहसीलदार अमोल बन, शेख भाऊसाहेब, प्रभागातील नगरसेविका शबानाबी नुरोद्दीन सैय्यद, नगरसेविका नजमाबी कागदी, बाबू शेठ, गफ्फार कागदी, मुसा मलिक, माजिद मोमीन, अनीस जनाब, आसा झारे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शासनाच्या योजना थेट नागरिकांपर्यंत पोहोचत असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button