उत्राण येथे आमदार अमोल दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

प्रतिनिधी – उत्राण येथे एरंडोल पारोळा विधानसभेचे आमदार अमोल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व युवासेना उत्राण यांच्या वतीने श्री स्वामी समर्थ केंद्रात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सदर रक्तदान शिबिरास प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून विशेष बाब म्हणजे महिलांनी ही पुरुषानं बरोबरीने रक्तदान केले सदर रक्तदान शिबिरात 47 दात्यांनी रक्तदान केले असून सदर शिबिर यशस्वितेसाठी एरंडोल पंचायत समितीचे माजी सभापती अनिल भाऊ महाजन, शेतकरी सहकारी संघाचे संचालक पांडुरंग पाटील, तालुका उपप्रमुख राजेंद्र पाटील, माजी सरपंच विनोद महाजन, पिंटू वाघ, ग्रामपंचायत सदस्य हरेश पांडे, गुरुदास चौधरी, मा.सदस्य अमोल महाजन, विकास सोसायटी संचालक विलास महाजन, ठाणे येथील पोलिस जगदीश पाटील, हिरालाल पाटील, राजू कोळी व सर्व शिवसैनिक व युवासैनिक यांनी मेहनत घेतली.




