जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

पिंजारी समाजातर्फे पालिका प्रशासनाला मागण्यांचे निवेदन

एरंडोल (प्रतिनिधी) – एरंडोल येथील पिंजारी समाजातर्फे शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर व मुख्याधिकारी अमोल बागुल यांना निवेदन देण्यात आले. समाजाच्या कब्रस्तान परिसरातील स्वच्छता, प्रकाशयोजना व संरक्षक भिंतीसह रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पिंजारी समाजाच्या कब्रस्तान परिसरात नियमित स्वच्छता मोहीम राबवावी, पुरेशी प्रकाशयोजना करावी तसेच संरक्षक भिंत उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी. तसेच रमजानचा पवित्र महिना सुरू होण्यापूर्वी शहरातील मुस्लिम वॉर्ड परिसरात स्वच्छता, आरोग्य व पाणीपुरवठा याबाबत विशेष उपाययोजना कराव्यात.
मुस्लिम वॉर्ड परिसरात नियमित गटार स्वच्छता, डास प्रतिबंधक पावडरची फवारणी, फॉगिंग आणि कीटकनाशक फवारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. नमाजाच्या वेळा लक्षात घेऊन सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यान पाणीपुरवठा करावा व दोन दिवसाआड नियमित पाणी सोडावे, अशीही मागणी करण्यात आली.
तसेच शहरात वाढलेल्या वराहांच्या (डुकरांच्या) समस्येबाबत तात्काळ कारवाई करून त्यांना पकडण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांनी निवेदनाची दखल घेत सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी शहरातील माजी नगरसेवक असलम पिंजारी, सामाजिक कार्यकर्ते रईस शेख, कादर पिंजारी, तौसिफ पिंजारी, आमीन पिंजारी, साहिल पिंजारी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button