जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्र

विखरण येथे विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

प्रतिनिधी एरंडोल – तालुक्यातील विखरण येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, इयत्ता १ ली ते ७ वीतील विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रत्नाकर शिंपी फरकांडेकर यांनी स्वखर्चाने हा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना लेखन साहित्य, पेन, फरसाण पाकिट व चॉकलेटचे वितरण केले.
यावेळी रत्नाकर शिंपी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. शिक्षण हीच खरी संपत्ती असून विद्यार्थ्यांनी उपलब्ध साधनांचा योग्य वापर करून प्रगती साधावी, असे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैक्षणिक साहित्याचा योग्य उपयोग करून नियमित अभ्यास करण्याचे व शालेय शिक्षणात उत्कृष्ट प्रगती साधण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच गोपाल महाजन होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतिश चव्हाण यांनी केले. मुख्याध्यापक भाईदास पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी गणेश शिंपी फरकांडेकर, राजेंद्र राठोड, कृष्णा कापडणे, सुनिल शिंपी, मनिषा महाजन (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती), दिपाली पाटील (उपाध्यक्ष), तसेच शिक्षकवर्गातील सुरेखा पाटील, राजेंद्र ठाकूर, सुरेखा राजपूत, सतिश चव्हाण, मनिषा पाटील, प्रतिभा पाटील, ज्योत्स्ना पाटील, भगवान देसले आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांचे आभार राजेंद्र ठाकूर यांनी मानले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालकांनी शाळेच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button