जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांच्या स्थानिक विकास निधीतून एरंडोल तालुक्यातील शाळांना पोडीयम वितरण

एरंडोल :- सत्यजित तांबे पदवीधर मतदारसंघ, नाशिक विभाग यांच्या सन २०२५-२०२६ च्या स्थानिक विकास निधीतून एरंडोल तालुक्यातील विविध शाळांना पोडियम चे वितरण करण्यात आले. हा कार्यक्रम जिजामाता माध्यमिक विद्यालय, एरंडोल येथे उत्साहात संपन्न झाला.
या उपक्रमामुळे शाळांमधील शैक्षणिक कार्यक्रम, भाषणे, स्नेहसंमेलन तसेच विविध शैक्षणिक उपक्रमांना अधिक शिस्तबद्ध व सुसज्ज स्वरूप मिळणार आहे. शिक्षक आमदार सत्यजित तांबे यांनी शिक्षण क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी सातत्याने दिलेल्या पाठबळा चे हे एक महत्त्वपूर्ण उदाहरण असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या प्रसंगी डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. एन. बी. गायकवाड, टीडीएफचे ज्येष्ठ पदाधिकारी तथा माजी माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते.
या अंतर्गत नवलभाऊ माध्यमिक विद्यालय ताडे, जि. प. प्राथमिक केंद्र शाळा उत्राण गु. ह., शहजादी उर्दू प्रायमरी स्कूल कासोदा, जि. प. प्राथमिक मराठी शाळा नं. २, उन्नती माध्यमिक विद्यालय, सार्वजनिक माध्यमिक विद्यालय कासोदा, माध्यमिक विद्यालय भालगाव, गौरीशंकर माध्यमिक विद्यालय रवंजे, सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय पिंपळकोठा तसेच जिजामाता माध्यमिक विद्यालय एरंडोल या शाळांना पोडियम चे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे तालुक्यातील शाळांच्या शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button