जळगावदेश-विदेशधार्मिकमहाराष्ट्र

एरंडोल येथील गोशाळे ला राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित..

प्रतिनिधी एरंडोल – येथील गोमाता राजलक्ष्मी बहुउद्देशीय संस्थेला पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे  यांच्यातर्फे देण्यात येणारा महाराष्ट्र शुद्ध देशी गोवंश सन्मान योजनेअंतर्गत सन २०२५-२६ चा गोवंश- पक्षेत्र
विभागातून निवडी द्वारे  परळी- वैजनाथ येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांच्या उपस्थितीत संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. नरेंद्र पाटील  , सचिव तथा माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील यांना  “श्रेष्ठ राजदूत” घोषित करून सन्मानपत्र व  ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
         गो शाळेत २५ शुद्ध देशी गीर गाई असून गेल्या आठ वर्षापासून सदर दांपत्याने गो-सेवेवा, संवर्धन, रक्षण व सेवा सुरू असून त्यातून पर्यावरण, कृषी, पंचगव्य, साबण, शुद्ध देशी तूप,दुध उत्पादन विक्री करून स्वदेशीचा संदेश देखील देत आहेत.
           सदर सन्मानाबद्दल त्यांच्यावर सामाजिक, राजकीय, मंडळींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button