जळगावधार्मिकमहाराष्ट्र

*एरंडोल येथे महाशिवरात्री निमित्त यात्रोत्सवात पहिल्या दिवशी भाविकांची मोठी गर्दी……..!*

प्रतिनिधी एरंडोल – येथे अंजनी नदीकाठावरील महादेवाच्या जुन्या मंदिरात १५ फेब्रुवारी २०२६ रोजी यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या हस्ते सपत्नीक सकाळी अभिषेक पूजा पार पडली.त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.त्यानंतर दिवसभर महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रिघ लागली होती.दुपारी श्री कैलासपतींची महापूजा होऊन महादेवाच्या प्रतिमेची वाजत गाजत शहरातून मिरवणूक काढण्यात आली.रात्री ह.भ.प.अशोकदास महाराज शिरपूरकर यांच्या किर्तनाचा भाविकांनी लाभ घेतला.
       सकाळी महादेव मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांच्याकडून भाविकांना ५ हजार राजगिरा लाडूचा प्रसाद वाटप करण्यात आला.तर जय भोले ग्रुप तर्फे भाविकांना साबुदाणा खिचडी वितरीत करण्यात आली.जवळपास २० हजार भाविकांनी सदर प्रसादाचा लाभ घेतला.
       यात्रोत्सवासाठी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेशसिंग परदेशी, ॲड.नितीन महाजन, गोपाल पाटील,व्हि.के.महाजन, अशोक चौधरी,दिनेश पाटील छोटू पहेलवान, वसंत चौधरी, संजय महाजन,दगडू चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button