जळगावराजकारण

माझा संकल्प-भूमी सुपोषण चळवळ ,अमळनेरमध्ये महाशोभायात्रेस अभूतपूर्व प्रतिसाद

समाजातील सर्वच घटकांसह माता-भगिनींही नोफ्लदविला उत्स्फूर्त सहभाग

अमळनेर  ( विशेष प्रतिनिधी ) – कृषी क्षेत्रातील अग्रगण्य सेवाभावी संस्था अक्षय कृषी परिवार व येथील मंगळग्रह सेवा संस्था यांच्यातर्फे ‌‘माझा संकल्प-भूमी सुपोषण चळवळी‌’साठी जनजागर व्हावा, याकरिता बुधवार, दि. 18 फेब्रुवारी रोजी सकाळी शहरातून भव्य महाशोभायात्रा काढण्यात आली. या महाशोभायात्रेस अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. समाजाजील सर्वच घटकांनी यात सहभाग नोंदविला. त्यात विविध महिला संघटना, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी- विद्यार्थिनी तसेच वारकरी संप्रदायातील प्रतिनिधींनीही उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला, हे विशेष!
संतश्री संखाराम महाराज वाडी संस्थानापासून सकाळी 8 वाजता महाशोभायात्रेचा प्रारंभ झाला. संतश्री प्रसाद महाराज यांनी महाशोभायात्रेचे उद्घाटन केले. अक्षय कृषी परिवाराचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. गजानन डांगे व प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी श्री भूमीमातेचे पूजन केले. तत्पूर्वी, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त श्रीमती जयश्रीताई साबे, डी. ए. सोनवणे, आनंद महाले, मुख्य कार्यकारी अधिकारी आर. जी. चव्हाण, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मंगल सेवेकरी विनोद कदम, प्रकाश मेखा, आशिष चौधरी, निलेश महाजन, बाळा पवार, अमोल महाजन व दै. ग्लोबल महातेज परिवारातर्फे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर महाशोभायात्रा मार्गस्थ झाली. सराफ बाजार, तिरंगा चौक, कोफ्लबडी बाजार, हॉटेल पायल, सुभाष चौक, राणी लक्ष्मीबाई चौक, मोठा बाजार, दगडी दरवाजा, फरशी रोडमार्गे श्री मंगळग्रह मंदिरात महाशोभायात्रेची सांगता झाली. महाशोभायात्रेतील सहभागींकरीता मंगळग्रह सेवा संस्थेने नाश्ता, चहा-पान व भोजनाची व्यवस्था केली होती.

श्री भूमीमाता रथाने वेधले लक्ष
सजविलेल्या पालखीत श्री मंगळग्रह देवतेची पंचधातूंची उत्सवमूर्ती ठेवण्यात आली होती. श्री भूमीमाता रथाने अमळनेरकरांचे लक्ष वेधलेे. तसेच विविध लेझीम पथके, ढोल पथक, संतश्री सखाराम महाराज वाडी संस्थानाच्या वेदपाठशाळेतील बाल वारकरी, तालुक्यातील विविध भजनी मंडळांनी महाशोभायात्रेत सहभाग नोफ्लदविला. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी- विद्यार्थिनी, कृषी क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला मंडळे, हरिभक्त परायण भजनी मंडळ, ढोल-ताशे, टाळ-मृदुंगाच्या गजराने शहरातील वातावरण मंगलमय झाले होते. विविध महिला मंडळांतील नऊवारी साडीतील कलशधारी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. विद्यार्थी- विद्यार्थिनींनी केलेल्या महापुरुषांच्या वेशभूषेनेही साऱ्यांचे लक्ष वेधलेे. महाशोभायात्रा मार्गावर ठिकठिकाणी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. तसेच विविध मान्यवरांच्या पुढाकारातून महाशोभायात्रेतील उपस्थितांना चॉकलेट, बिस्कीट, वेफर्स, पाणी बॉटल वाटप करण्यात आले.

यांचा होता सक्रिय सहभाग
प्रताप महाविद्यालय, सावित्रीबाई कन्या शाळा, लोकमान्य विद्यालय, एन. टी. मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, विजयनाना पाटील आर्मी स्कूल, जी. एस. हायस्कूल, साने गुरुजी विद्यालय, एम. एस. मुंदडा विद्यालय (माळीवाडा), कळमसरे मुलांची जि. प. शाळा, लायन्स व रोटरी क्लब, जायन्ट्स ग्रुप, महिला हौसिंग सोसायटी (गुजरात), फुलराणी ग्रुप, आशा स्वयंसेविका आदींसह विविध सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोफ्लदविला.

घोषवाक्यांद्वारे जनजागृती
माती जपा-पाणी वाचवा, एक मूठ माती राष्ट्रासाठी, रासायनिकमुक्त शेती-हीच खरी देशभक्ती, जपूया माती-घडवूया समृद्धी, मातीची पूजा-राष्ट्राची सेवा, रासायनिक शेती सोडा-सेंद्रीय शेती जोडा, भूमी वाचवा-भविष्य घडवा, भूमी सुपोषण चळवळ महान, शेतकरी वाचला तर देश वाचला, एच ध्यास-मृदा विकास आदी घोषवाक्यांद्वारे जनजागृती करण्यात आली.

या मान्यवरांची लाभली उपस्थिती
महाशोभायात्रेत उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन नीरज अग्रवाल, संचालक पंकज मुंदडे, योगेश मुंदडे, लायन्स क्बलचे अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सचिव महेंद्र पाटील, मनीष जोशी, नितीन विंचूरकर, डॉ. रवींद्र कालरा, डॉ. मिलिंद नवसारीकर, डॉ. धीरज कोकाटे, प्रीतेश पारख, प्रकाश जैन, अभिनय मुंदडा, माळी समाजाचे अध्यक्ष मनोहर महाजन, लिनेस क्लबच्या डॉ. मयूरी जोशी, सोनल जोशी, कविता पारख, यजदी भरुचा, प्रदीप जैन, सुनील चौधरी, राजेश कुंदनानी व सूरज वरलानी, महावीर पहाडे, श्रमसाफल्य एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष अभिजीत भांडारकर, माजी नगरसेवक संजय पाटील आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


आमदार अनिलदादा पाटलांनी वाढविला उत्साह
आमदार अनिलदादा पाटील यांनी महाशोभायात्रेस भेट दिली. याप्रसंगी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास माल्यार्पण केले. महाशोभायात्रेतील सहभागींना भेटून त्यांचे कौतुक केले. तसेच उघड्या जीपमधून संपूर्ण महाशोभायात्रेची पाहणी करून महाशोभायात्रेतील सहभागींचा उत्साह वाढविला. याप्रसंगी ठिकठिकाणी महाशोभायात्रेचे शहरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. आमदार अनिलदादांची उपस्थिती महाशोभायात्रेतील सहभागींचा उत्साह वाढविणारी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button