जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रशैक्षणिक

एरंडोल येथे दहावीची परीक्षा शांततेत सुरू ….!

कॉपी मुक्त अभियानास उस्फुर्त प्रतिसाद.

प्रतिनिधी एरंडोल: कॉपीमुक्त परीक्षा घेण्याचा प्रशासना च्या निर्धारनुसार शहरात दहावीची परीक्षा दोन केंद्रावर अत्यंत शांतते त सुरळीतपणे सुरू झाल्या, रा.ती.काबरे विद्यालय जिजामाता माध्यमिक विद्यालय दोन्ही केंद्र मिळून ९४६ विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ट होते. काबरे विद्यालयात केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यापक एस एस राठी, तर जिजामाता माध्यमिक विद्यालय येथे पी एस केदार हे परीक्षेचे कामकाज पाहत आहेत.
दोन्ही परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, झूम ॲप याद्वारे या तांत्रिक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आले आहेत. संपूर्ण परीक्षा आहे पारदर्शक व शिस्तबद्ध वातावरणात सुरू आहे.
कॉपी मुक्त अभियाना अंतर्गत भरारी पथके, बैठी पथके तैनात आहेत. तहसीलदार गोपाळ पाटील गटशिक्षणाधिकारी आरडी महाजन, शिक्षण विस्तार अधिकारी जी डी पाटील यांच्या पथकाने केंद्रावर भेटी दिल्या. दोन्ही परीक्षा केंद्रांच्या बाहेर पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button