जळगावमहाराष्ट्र

स्वच्छता, समता व व्यसनमुक्तीचा संदेश देत संत गाडगे महाराजांची १५० वी जयंती एरंडोलात उत्साहात..

प्रतिनिधी एरंडोल : संत गाडगे महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एरंडोल येथील परीट धोबी समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेमार्फत प्रभा नगर येथील संत गाडगेबाबा धोबी समाज मंदिरात प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत गाडगेबाबा महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर, उपनगराध्यक्षा सुनिता माळी, नगरसेवक तथा गटनेते प्रा. मनोज पाटील, नगरसेविका शारदा मराठे, आनंद दाभाडे,यांच्यासह डॉ. सुरेश पाटील,रमेश महाजन, शालिग्राम गायकवाड, माजी जि. प. सदस्य नानाभाऊ महाजन , नगरसेवक प्रशांत महाजन,अमोल तांबोली, अनिल महाजन, नितेश चौधरी,डॉ. सुधीर काबरा, गोपाल पाटील, एस आर पाटील, रुपेश महाजन,अतुल महाजन, अतुल मराठे, नितीन चौधरी समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
          कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी व युवकांनी संत गाडगे महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित मनोगते व्यक्त केली. काही ठिकाणी स्वच्छता जनजागृतीची शपथ घेण्यात आली.
          कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर मोराणकर, प्रास्ताविक किशोर निंबाळकर, आभार प्रदर्शन योगेश वाघ यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
योगेश वाघ ,प्रदीप सूर्यवंशी, आबा महाले, शाम जाधव, रवींद्र निंबाळकर, समाधान शिरसाडे, नितीन तेलंगे, सोमनाथ माने जयवंत वाघ, अनिल शिरसाडे, रोहिदास वाघ,
प्रमोद जाधव, चेतन महाले, अमोल तेलंगे,परीट धोबी समाज सेवा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button