जळगावमहाराष्ट्रराजकारण

विकासाची मॅरेथॉन 2.0 द्वारे प्रगतीच्या नव्या अध्यायाला सुरुवात – आमदार अमोल पाटील

प्रतिनिधी, एरंडोल : तालुक्यात विकासाचा वेग अधिक गतिमान करण्याच्या उद्देशाने “विकासाची मॅरेथॉन 2.0 – प्रगतीचा नवा अध्याय” या उपक्रमांतर्गत  विविध गावांमध्ये मंजूर कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळे उत्साहात पार पडला.तसेच पातरखेडा, भालगाव बु, नंदगाव, टोळी, पिंपळकोठा खु, पिंपळकोठा बु., पिंप्री बु., विखरण,चोरटक्की, रिंगणगाव, पिंपळकोठा प्र.चा., खर्ची बु,खर्ची खु, श्रीक्षेत्र सुकेश्वर, रवंजे खु,रवंजे बु., दापोरी, खेडी खु., कढोली, वैजनाथ व टाकरखेडा आदी गावांमध्ये विविध विकासकामांना प्रारंभ करण्यात आला. आमदार. अमोल पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे विखरण-रिंगणगाव जिल्हा परिषद गटातील अनेक गावांसाठी कोट्यवधी रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.
या अंतर्गत रस्ते मजबुतीकरण, गटारी बांधकाम, पाणीपुरवठा योजना, सभामंडप उभारणी, शासकीय इमारती दुरुस्ती तसेच इतर पायाभूत सुविधा विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या कामांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध होणार असून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.
यावेळी बोलताना आमदार अमोल पाटील म्हणाले, “विकास ही केवळ घोषणा नसून तो प्रत्यक्षात उतरलेला संकल्प आहे. एरंडोल तालुक्याच्या प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास करणे ही माझी जबाबदारी आहे. जनतेने दाखविलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. रस्ते, पाणी, वीज, शिक्षण व सामाजिक सुविधा सक्षम करणे हे आपले प्राधान्य आहे.”
पुढे ते म्हणाले, “राजकारण हे सत्तेसाठी नसून समाजसेवेसाठी आहे. सर्वांनी एकजुटीने काम केल्यास एरंडोल तालुका विकासाच्या बाबतीत राज्यात आदर्श ठरेल. येणाऱ्या काळात आणखी मोठी विकासकामे तालुक्यात आणण्याचा माझा संकल्प आहे.”
या कार्यक्रमांना स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विकासाच्या या नव्या पर्वाचे ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button