लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी एरंडोल च्या डॉ . ठाकूर पती – पत्नीचा आदर्श निर्णय !

प्रतिनिधी – एरंडोल नगरपालिकेचे नवनिर्वाचित
नगराध्यक्ष डॉ . नरेंद्र सुशीला धुडकु ठाकूर व धर्मपत्नी डॉ . सौ . गीतांजली ठाकूर नगरसेविका यांनी शासकीय मानधनाची संपूर्ण रक्कम स्वतः कडे न घेण्याचा निर्णय घेतला आहे .एरंडोल नगरपालिका संचलित “कर्मवीर अभ्यासिका “विकसित करणेसाठी व कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्या वैयक्तिक सोयीसुविंधाकरता “हि संपूर्ण रक्कम वापरावी अशी विनंती एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री . अमोल बागुल यांचे कडे विशेष पत्राद्वारे केली आहे .
एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्य नगरपालिका अधिनियम १९६५ (६१/१ ) च्या तरतुदीनुसार डॉ . नरेंद्र ठाकूर यांना दरमहा १५००० ( पंधरा हजार )रुपये इतके मानधन शासनाकडून देय असते . तर डॉ . गीतांजली ठाकूर यांना नगरसेविका म्हणून प्रत्येक बैठकीसाठी भत्ता हा शासनाकडून देय असतो .
एरंडोल शहरात पायाभूत विकासकामांचा आरंभ नवीन लोकनियुक्त पदाधिकारी यांचेकडून मोठ्या प्रमाणात नियोजित करण्यात येत आहे . त्याचप्रमाणे स्वच्छता अभियानाची सुरुवात हि नगरपालीका तर्फे करण्यात आलेली आहे . पाणीपुरवठा वेळेवर व व्यवस्थित करणेसाठी नियोजन करण्यात येत आहे .
परंतु नगरपालिकेकडे प्राप्त होत असलेल्या स्थानिक नगरपालिका निधीची रक्कम हि तुटपुंजी असल्यामुळे सामाजिक बांधिलकी व संवेदनशीलतेचे विषय हाताळतांना काही अडचणी येत असल्याचे नगराध्यक्ष यांच्या निदर्शनास आल्यामुळे डॉ . नरेंद्र ठाकूर यांनी आपल्या संपूर्ण मानधनाची रक्कम व डॉ . गीतांजली ठाकूर यांचा बैठक भत्ता स्वतः न घेता तो विद्यार्थी वर्गासाठी अतिशय उपयुक्त असलेल्या नगरपालिका संचलित ” कर्मवीर अभ्यासिका ” च्या देखभालीसाठी व अभ्यासिका अजून विकसित करणेसाठी आणि एरंडोल नगरपालिकेत सद्यस्थितीत कठीण परिस्थितीत कार्य करणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्या वैयक्तिक सोयीसुविधांसाठी त्या रक्कमेचा विनियोग करावा असे विनंती पत्र मुख्याधिकारी यांचेकडे दिनांक २५-२-२६ रोजी सादर केले आहे .
मुख्याधिकारी यांनी पुढील कार्यवाहीसाठी प्रशासनास आदेश दिले आहेत . विशेष म्हणजे २५ फेब्रुवारी हा डॉ . नरेंद्र व डॉ . गीतांजली ठाकूर यांचा लग्नाचा वाढदिवस असतो .
लग्नाचा वाढदिवशी डॉ . नरेंद्र व डॉ . गीतांजली ठाकूर यांनी घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र कोतुक होत आहे .




