जळगावमहाराष्ट्र

श्रीमती के. डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये धुलीवंदन उत्साहात साजरे.

प्रतिनिधी एरंडोल :-  शहरातील श्रीमती के डी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल येथे धुलीवंदनाचा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील सर्व शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी एकत्र येत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना धुलीवंदनाचे सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. रंगांचा सण हा आपापसातील भेदभाव विसरून एकोपा, बंधुभाव आणि आनंदाचे प्रतीक असल्याचे शिक्षकांनी सांगितले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी सुरक्षित व पर्यावरणपूरक पद्धतीने धुलीवंदन साजरे केले.
शाळेच्या परिसरात रंगांची उधळण, हास्य आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विद्यार्थ्यांनी एकमेकांना अबीर-गुलाल लावून शुभेच्छा दिल्या. शिक्षकवर्गानेही विद्यार्थ्यांसोबत सहभाग घेतल्याने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
मुख्याध्यापकांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सुरक्षितता पाळण्याचे आवाहन करत सण साजरा करताना शिस्त व आनंद यांचा समतोल राखण्याचा संदेश दिला. कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आल्यामुळे सर्वांनी आनंददायी वातावरणात धुलीवंदन साजरे केले.
या रंगोत्सवामुळे शाळेत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button