कासोदा पोलिसां तर्फे सन्मान सोहळ्याचे आयोजन

प्रतिनिधी एरंडोल: कासोदा येथील पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत व्यक्तींचा सत्कार सन्मान सोहळा कासोदा पोलीस स्टेशनच्या आवारात दोन मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी खास करून चाळीसगाव उपविभागीय अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड हे उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक पोलीस कॉन्स्टेबल नरेंद्र गजरे यांनी केले . कासोदा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शिवजयंती,’महाशिवरात्री, पोलीस भरती स्पर्धात्मक परीक्षेची तयारी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचे कासोदा पोलिसांच्या मनात होते .ते आज या सोहळ्याद्वारे साकार करण्यात आले .
त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले उपविभागीय अधिकारी विजय ठाकूरवाड सरपंच पुरुषोत्तम चौधरी ‘जेष्ठ पत्रकार नरेंद्र पाटील यांचे स्वागत एपीआय श्रीकांत पाटील व पीएसआय धर्मराज पाटील यांनी केले त्यानंतर पोलीस भरती स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी भावेश जितेंद्र पाटील(भातखेडे ),विशाल दिगंबर अहिरे (भातखेडे ), विशाल गणेश पाटील ( नांद खुर्द, ‘ व विद्यार्थिनी जयश्री रवींद्र भालेराव उत्राण ।गु ह ), दिव्या भिमसिंग पाटील ( जळू ) नम्रता रमेश मते कासोदा यांचा सन्मानचिन्ह प्रशिस्त पत्र देऊन सन्मान करण्यात आला त्याचप्रमाणे उत्राण (अ .ह ) येथील रंजना दिलीप ठाकरे व पोलीस पाटील प्रदिप कुमार तिवारी यांनी 25 अंगणवाडीतील बालकांचा सिलेंडरचा स्फोट होत असताना जीव वाचवला त्याबद्दल दोघांनाही सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात आले तसेच मधुकर ठाकूर विनामूल्य सेवाभावी उपक्रम राबवत असल्याबद्दल व होमगार्ड शौकत अली रमजान महिना असतानाही देखील कीर्तन व मस्जीद बंदोबस्त सुरेख चांगल्या पद्धतीने कार्य केल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. महाशिवरात्रीनिमित्त जय भोले ग्रुप कासोदा यांनी रक्तदान शिबिर व उत्कृष्ट शोभायात्रा जिवंत देखावे व शिस्तीत मिरवणूक केल्यामुळे व यारी दोस्ती ग्रुप कासोदा यांनी शिवजयंती मिरवणुकीत गुलालाची उधळण न करता फुलांची उधळण करून वेळेत मिरवणूक व तसेच जय शिवराय मंडळ यांनी मशिद मार्ग वगळून मिरवणूकी चा मार्ग बदलून फुलांची उधळ करून शिवजयंती साजरी केली . विशेष म्हणजे राजमुद्रा ग्रुप आडगाव यांनी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबिर आयोजित करून स्पर्धा परीक्षेचे पुस्तक शिवजयंतीच्या वर्गणीतून घेऊन मुलांना स्पर्धा परीक्षेसाठी लायब्ररी उपलब्ध करून दिली . तसेच क्रांती चौक मंडळ फरकांडे यांनी शिवजयंतीची मिरवणूक रद्द करून प्रा .नमिता पाटील पुणे यांचे व्याख्यान आयोजित केले . छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर न घेता डोक्यात ठेवून तसे आचरण करावे हे समाजाला दाखवून दिले . त्यांच्यामुळे त्यांचाही सन्मान चिन्ह पुष्प देवून सत्कार उपविभागीय अधिकारी श्री विजय कुमार ठाकूरवाड , स .पो .नी .श्रीकान्त पाटील पीएसआय धर्मराज पाटील सरपंच पुरुषोत्तम चौधरी नरेंद्र पाटील पत्रकार यांच्या हस्ते करण्यात आला . या कार्यक्रमा साठी सर्व पोलीस पाटील सांस्कृतीक मंडळाचे पदाधिकारी ‘ सर्व पत्रकार माजी सरपंच महेश पांडे सुनिल पाटील ( उमरे )’ प्रविण बाविस्कर उपस्थित होते शिवसेनेचे तालुकाप्रमुख रवींद्र चौधरी यांनी आपल्या मनोगतात विचार मांडताना सांगितले की आत्तापर्यंत जे काही कार्यक्रम झाले ते कार्यक्रम वर्गणी गोळा करून करण्यात आले परंतु आजचा जो कार्यक्रम आहे तो एकदम उत्कृष्टरित्या व कोणाकडूनही एक रुपया न मागता कोणाला त्रास न देता कार्यक्रमाचे आयोजन केले म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांचे खास करून अभिनंदन त्यांनी केले त्यात उपस्थिततांमधून चांगला टाळ्यांच्या गडगडांसह प्रतिसाद मिळाला अनेकांनी रवींद्र चौधरी यांच्या भाषणाचे कौतुक केले. तसेच,पत्रकार नरेंद्र पाटील राजेंद्र ठाकरे सर ‘पोलीस बांधव यांनी या कार्यक्रमाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचा उद्देश हेतू कथन करताना स .पो.नी श्रीकांत पाटील यांनी समाजात जे जे चांगलं घडत आहे जे चांगलं घडवायचं आहे त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा देणे हे हे काम समाजाबरोबर पोलिसांचे आहे . समाजाचा उत्तरदायित्व निभावून व कायदा सुव्यवस्था उत्तम राखण्यासाठी समाजाचे सहकार्य अपेक्षित आहे . त्या कर्तव्य भावनेतून सदर सन्मान सोहळा चे आयोजन करण्यात आले . यापुढेही चांगल्या कामांना असेच सहकार्य कासोदा पोलीस टीमच्या वतीने राहील .पोलिसांचे ब्रीद वाक्य प्रमाणे सदरक्षणाय खलनिग्रहणाय आहे त्याप्रमाणे आमचे वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज सुरू राहील . जनतेचे तरुण मित्रांचे सहकार्य मिळत आहे ते असेच मिळत राहो अशी अपेक्षा व्यक्त केली व आभार मानले . कार्यकमाचे सुरेख सुत्रसंचलन प्रविण महाजन यांनी केले .



