जळगावमहाराष्ट्रशैक्षणिक

विद्यार्थ्यांची सनी अर्थ मिनरल्स येथे शैक्षणिक भेट..

प्रतिनिधी एरंडोल : – येथील यशवंतराव चव्हाण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रीमती के.डी. पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी औद्योगिक क्षेत्राची प्रत्यक्ष माहिती मिळावी या उद्देशाने सनी अर्थ मिनरल्स, येथे  शैक्षणिक भेट दिली.
या भेटीदरम्यान कंपनीचे मॅनेजर राम बिहारी व सहाय्यक सुरेश शिंदे यांनी विद्यार्थ्यांना कंपनीचे कामकाज कशा पद्धतीने चालते, खनिज प्रक्रिया कशी केली जाते तसेच कंपनीमध्ये काम करणारे कामगार कोणत्या प्रकारे काम करतात याची सविस्तर माहिती दिली. औद्योगिक व्यवस्थापन, कामगारांची भूमिका व उत्पादन प्रक्रिया याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून मार्गदर्शन मिळाले.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राची ओळख होऊन त्यांचे ज्ञान समृद्ध झाले. विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत उत्सुकता व्यक्त केली.
या प्रसंगी शाळेचे प्राचार्य दीनानाथ पाटील व शिक्षक किरण महाजन यांनी भेट यशस्वी होण्यासाठी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थिनी कु. आर्या वडजे हिने राम बिहारी व सुरेश शिंदे यांचे आभार मानले.
या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्राविषयी प्रत्यक्ष माहिती मिळाल्याने त्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक समृद्ध झाल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button