आरोग्यजळगावताज्या बातम्यादेश-विदेशमहाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त एरंडोलमध्ये आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम.

प्रतिनिधी एरंडोल : एरंडोल नगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२५ अभियानांतर्गत महिला व बालकल्याण विभागामार्फत दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (DAY-NULM) अंतर्गत जागतिक महिला दिनानिमित्त आरोग्य विषयक विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्य, वैयक्तिक स्वच्छता, पोषण, तसेच विविध आरोग्यविषयक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. महिलांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण व्हावी व निरोगी जीवनशैलीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एरंडोल नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. नरेंद्र ठाकूर राहणार असून प्रमुख वक्त्या म्हणून निधी फाउंडेशन, जळगाव येथील सौ. वैशाली विसपुते या महिलांच्या आरोग्य विषयक विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी उपनगराध्यक्षा सौ. सुनिता माळी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. पौर्णिमा देवरे तसेच मुख्याधिकारी श्री. अमोल बागुल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
हा कार्यक्रम दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता कर्मवीर अभ्यासिका हॉल, एरंडोल येथे आयोजित करण्यात आला असून एरंडोल शहरातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्यविषयक मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन एरंडोल नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button