शैक्षणिक

अमळनेर येथील निवृत्त मुख्याध्यापिका प्रमोदिनी पाटील आदर्श शिक्षिका तसेच आदर्श समुपदेशक म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित.

प्रतिनिधी –  अमळनेर येथील खान्देश  शिक्षण मंडळाच्या प्रताप हायस्कूल मधील निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती प्रमोदिनी बळीराम पाटील यांना दिल्ली येथील नॅशनल अचीवर रिकगनायझेशन फोरम टीम, झेनित इंटरनॅशनल, इंडियन गॅलेक्सी फाउंडेशन न्यू दिल्ली या आंतरराष्ट्रीय मानांकित संस्थांमार्फत एकत्रितपणे दिला जाणाऱ्या यंदाचा आदर्श शिक्षिका तसेच आदर्श समुपदेशक राष्ट्रीय पुरस्कार 8 मार्च 2025 महिला दिनानिमित्त दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदन येथे आयोजित कार्यक्रमात दिनांक 9 मार्च 2025 रोजी  प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री श्री रामदास आठवले, माजी राज्यपाल कमलताई गवई( सिक्कीम आसाम आणि बिहार), यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सदर राष्ट्रीय पुरस्काराच्या पाच जिल्ह्यांमधून श्रीमती प्रमोदिनी पाटील या एकमेव मानकरी ठरल्या आहेत. यापूर्वी देखील त्यांना महावीर  आंतरराष्ट्रीय फाउंडेशन नाशिक यांच्याकडून आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यामुळे श्रीमती प्रमोदिनी पाटील यांचा राष्ट्रीय स्तरावपर्यंतचा प्रवास उल्लेखनीय आहे
     यंदाचा दिल्ली येथील राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय राज्यमंत्री व न्याय प्राधिकरण मंत्री श्री रामदासजी आठवले, तीन राज्यांच्या माजी राज्यपाल श्रीमती कमलाताई गवई, राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, अमरावतीचे खासदार बलवंत वानखेडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्याला सर्वोच्च न्यायालयाच्या श्रीमती मित्तल मॅडम, अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या माजी अध्यक्षा सौ सुरेखा लामतुरे व इतर मान्यवर उपस्थित होते. पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी देशभरातून तसेच देशाबाहेरिल सुद्धा  मान्यवर उपस्थित होते. प्रमोदिनी पाटील यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा पुढीलप्रमाणे. शिक्षण- बीएससी बीएड एम.एड.एम ए (फिलॉसॉफी), डिप्लोमा इन व्होकेशनल गायडन्स. अमळनेर तालुक्यातील खान्देश शिक्षण मंडळाचे प्रताप हायस्कूल व पूज्य साने गुरुजींची कर्मभूमीत 1990 पासून शिक्षिका म्हणून कार्यरत.नंतर मुख्याध्यापिका म्हणून कार्य केले.विविध स्पर्धा परीक्षा भारतीय संस्कृत ज्ञान परीक्षा सत्यशोधक प्रज्ञाशोध परीक्षा स्वामी विवेकानंदांचे जीवनावर आधारित परीक्षांचे दरवर्षी आयोजन, सतरा अठरा वर्षापासून एस.एस.सी.बोर्ड परीक्षा, चित्रकला परीक्षाच्या केंद्र संचालक म्हणून काम. पंचवीस वर्षापासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ नाशिक विभागाच्या समुपदेशक म्हणून कार्य, मराठी वांगमय मंडळ अभिरुची वांगमय मंडळ डायरेक्टर, भारतीय संस्कृती ज्ञान प्रदर्शन, विज्ञान प्रदर्शन व्यवसाय मार्गदर्शनपर प्रदर्शन, आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. जिल्हा समुपदेशक समितीच्या सदस्य, सर्व शिक्षा अभियान, करिअर मास्टर,मुख्याध्यापक- शिक्षक प्रशिक्षण यांच्या तज्ञ मार्गदर्शक. पाचवी आणि आठवीच्या स्कॉलरशिप परीक्षा संदर्भात शिक्षक मुख्याध्यापकांना तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रशिक्षण दिले. तसेच नंदुरबार जळगाव नाशिक औरंगाबाद धुळे जिल्ह्याच्या को-ऑर्डिनेटर- समन्वयक म्हणून काम पाहिले. अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघ महिला कार्यकारणी कार्यकारणी सदस्य, दहावी बारावी परीक्षा मार्गदर्शक समुपदेशक,हजारो विद्यार्थ्यांना मानसशास्त्रीय कसोट्यांच्या आधारे व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन करून तंत्र शिक्षण प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित केल्या. शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. लोकमत समूहाच्या लोकमत सखी मंच, बाल विकास मंच यांचे अमळनेर तालुका समन्वयक म्हणून काम पाहिले. कामगार कल्याण मंडळाच्या सल्लागार सभासद. महिला दक्षता समितीच्या सदस्य. नोकरदार कास्ट्राईब संघटनेच्या तालुका महिला अध्यक्ष. दरवर्षी किमान तीन गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षणासाठी दत्तक घेऊन त्यांचे दहावी बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी घेतली. काही विद्यार्थ्यांचे पूर्ण शिक्षण करण्याची जबाबदारी घेतली. माननीय धनगर साहेब यांनी “”आधुनिक सिंधुताई सपकाळ”” अशी उपाधी देऊन गौरविले. भारतीय कला व संस्कृती प्रदर्शन व”” वेध भविष्याचा” यासारखे व्यवसाय मार्गदर्शन वर प्रशिक्षण दिले. कोविड कालावधीत 2020 ते 2022 पर्यंत एक समुपदेशक, तज्ञ मार्गदर्शक व समन्वयक म्हणून दोन्ही तालुक्यांचे शिक्षक, मुख्याध्यापक व  पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी या सर्वांना परीक्षा संदर्भातील भीती दूर करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करून दिलासा देण्याचे कार्य केले.
        प्रमोदिनी पाटील यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button