एरंडोल नगरपरिषद निवडणूक २०२५ : प्रभाग ५ व ८ मधील महायुतीची भव्य प्रचार रॅली, आमदार अमोल पाटील यांचा जनसंपर्क..

प्रतिनिधी एरंडोल : आगामी नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर एरंडोल शहरातील प्रभाग क्र.५ व ८ मध्ये महायुतीतर्फे आज भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान महायुतीचे नेते व पदाधिकारी यांनी माय-बाप जनतेच्या भेटीगाठी घेतल्या तर कार्यसम्राट आमदार अमोलदादा पाटील यांनी घराघरात जाऊन जनसंवाद साधत मतदारांकडून आशीर्वाद घेतले.
प्रचार रॅली दरम्यान मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण असून उमेदवारांच्या बाजूने घणाघाती घोषणांनी परिसर दणाणून गेला. नागरिकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून महायुतीच्या उमेदवारांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, जि.प. मा. उपाध्यक्ष ज्ञानेश्वरनाना आमले, युवासेना जिल्हाप्रमुख व प्रभाग क्र.५ ब चे उमेदवार प्रा. मनोजभाऊ पाटील, तालुकाप्रमुख रविभाऊ जाधव, माजी नगराध्यक्ष राजुआबा चौधरी, एस.आर. बापू पाटील, खडके येथील जगदीशदादा पाटील, भैय्याभाऊ गुजर, आबासाहेब ठाकुर, पाटील समाज अध्यक्ष मंगेशदादा पाटील, संतोषदादा ठाकुर, सुभाषभाऊ मराठे, नारायणदादा ठाकुर, प्रकाशभाऊ ठाकुर, ज्ञानेश्वरभाऊ मराठे, जगदिश काका जगताप, पंडित आबा पाटील, नामदेव काका पाटील, सुनिल चौधरी, सुभाष बाबुलाल मराठे, आकाश ठाकुर, पिंटू मावळे, भैय्यादादा पाटील, सोनू ठाकुर, हरी ठाकुर, शहरप्रमुख बबलुदादा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
माहायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकुर, प्रभाग क्र.५ अ ची उमेदवार सत्यभामाबाई माधवराव पाटील, प्रभाग क्र.८ अ ची उमेदवार भारती मनोज गुर्जर तसेच प्रभाग क्र.८ ब च्या उमेदवार पौर्णिमा महेश देवरे यांच्यासह भाजप-शिवसेना महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रचार रॅलीमुळे महायुतीचे जनसंपर्क आणखी गतीमान झाले असून आगामी निवडणुकीत महायुतीची ताकद ठळकपणे जाणवली.




