हिवाळी अधिवेशनात ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करा — संघटनांचे एरंडोलमध्ये निवेदन

प्रतिनिधी एरंडोल – शहरातील ३० हून अधिक संघटनांनी आज उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांना निवेदन देत राज्यात येत्या हिवाळी अधिवेशनात कठोर ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्याची ठाम मागणी केली. निवेदन देताना शेकडो नागरिक उपस्थित होते.
संघटनांचे म्हणणे आहे की ‘लव्ह जिहाद’ हे खोटी ओळख, प्रेमजाळ, जबरदस्तीचे धर्मांतर, लैंगिक शोषण, तस्करी आणि दहशतवादी संबंध असलेले संघटित गुन्हेगारी जाळे असून राज्यात हजारो महिलांना त्याचा बळी पडावे लागते.
हिंदू जनजागृती समितीने यासाठी राबवलेल्या अभियानातून २५ हजारहून सह्या गोळा करून त्या निवेदनासोबत प्रशासनाकडे सादर केल्या.
प्रमुख मागण्या
उत्तर प्रदेशप्रमाणे कठोर, अजामीनपात्र कायदा महाराष्ट्रात लागू करावा.
तपासासाठी विशेष पोलीस शाखा स्थापन करावी.
विदेशी निधी, तस्करी व दहशतवादी संबंधांचा सखोल तपास करावा.
जबरदस्तीने धर्मांतरास मदत करणाऱ्या व्यक्ती व संस्थांवर बंदी आणावी.
अशा आशयाच्या मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या होत्या संघटनांनी हा कायदा हिवाळी अधिवेशनातच पारित करण्याची जोरदार मागणी केली.




