आरोग्यजळगावमहाराष्ट्र

मोफत मोतिबिंदू तपासणी शिबीराचा 127 जणांनी घेतला लाभ

मंगळग्रह सेवा संस्थेचा उपक्रम; शस्त्रक्रियेसाठी 71 रूग्ण पात्र

अमळनेर  विशेष प्रतिनिधी ) : येथील मंगळ ग्रह सेवा संस्था, ना. गुलाबरावजी पाटील सोशल फाउंडेशन (पाळधी), संकल्प सेवा फाउंडेशन (धनवाडी) व आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) यांच्यातर्फे रविवार, दि. 15 मार्च रोजी श्री मंगळ ग्रह मंदिरात मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर झाले. या शिबिराचा 127 रुग्णांनी लाभ घेतला. त्यापैकी 71 रुग्ण मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र ठरले आहेत. मंगळवार, दि. 17 मार्च रोजी श्री मंगळग्रह मंदिर येथून विशेष वाहनाने आर. झुणझुणवाला शंकरा आय हॉस्पिटल (पनवेल) येथे शस्त्रक्रियेसाठी त्यांना रवाना करण्यात येणार आहे.
या शिबिरात अमळनेर, धुळे, चोपडा, जळगाव, एरंडोलसह तालुक्यातील ग्रामीण भागातील रूग्णांचा सहभाग होता. डॉ. राहुल चौधरी, भुपेंद्र वाघ, विजय संमेसे, हर्षदा शिंदे, प्राची गायकवाड, योगेश कोळी, सागर पाटील यांनी तपासणी केली.
मंगळ ग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, रजनीकांत पाटील, गणेश शिंदे, प्रमोद पाटील, नितेश बारी आदींनी सहकार्य केले. दरम्यान, सदर शिबिर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी श्री मंगळ ग्रह मंदिर येथे नियमितपणे होते, याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button