जळगावधार्मिकमहाराष्ट्र

श्री मंगळग्रह मंदिरात दसऱ्यानिमित्त शस्त्रपूजन

अमळनेर : विजयादशमी अर्थात दसरा सणानिमित्त येथील मंगळग्रह सेवा संस्था संचलित श्री मंगळग्रह मंदिरात अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी शस्त्रपूजन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदा मंगळवार दि. 20 ऑक्टोबर रोजी सकाळी हा कार्यक्रम पार पडला.
अमळनेर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिका री विनायक कोते, अँड व्हि. आर. पाटील त्यांच्या धर्मपत्नी सौ. स्वातीताई पाटील हे शस्त्रपूजनाचे मानकरी होते. सुरूवातीला त्यांच्या शुभहस्ते विधिवत मंत्रोच्चारात संकल्प करण्यात आला. त्यानंतर गणपती पूजन, विश्वकर्मा स्मरण, तसेच प्रधान देवता मंगळग्रह देवाचे स्मरण करण्यात आले. त्यानंतर शस्त्रपूजन विधी पार पडला. मंदिराचे पुरोहित गणेश जोशी व वैभव लोकाक्षी यांनी पौरोहित्य केले.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिराव, मंगल सेवेकरी श्री. आर. टी. पाटील, श्री. प्रकाश मेखा, श्री. व्ही. व्ही. कुळकर्णी, श्री. पुषंद ढाके, श्री.आशिष चौधरी, मेजर राजेंद्र यादव मंगळग्रह सेवा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी भरत पाटील, शरद कुलकर्णी यांच्यासह मंदिर परिसरातील सेवेकरी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शस्त्रपूजा का करतात ?
पूर्वी राजे – महाराजांच्या काळात विजयादशमीच्या दिवशी शस्त्रपूजा केली जात असे. शस्त्रे धैर्य, शौर्य व संरक्षणाचे प्रतिक मानले जातात. शस्त्रपूजेच्या दिवशी पूर्वीच्या काळी राजे प्रगतीचे प्रतिक मानून राज्यांच्या सिमा ओलांडत कूच करत असत. यादिवशी केलेली पूजा विजय, धैर्य, यश आणि समृद्धी प्रदान करते, अशी मान्यता होती. ती आजही कायम आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button