जळगावताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

आमदार अँड अमोल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास; विखरणच्या असंख्य युवकांचा शिवसेनेत प्रवेश!

विकासकामे आणि युवकांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळत असल्याने शिवसेनेला बळ; प्रा. मनोजभाऊ पाटील, अमृतभाऊ चौधरी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

एरंडोल : विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲड. अमोल पाटील यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत विखरण, ता. एरंडोल येथील असंख्य युवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. आमदार पाटील यांनी पक्षात नव्याने दाखल झालेल्या युवकांचे स्वागत करून त्यांचा सत्कार केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे विखरण परिसरात शिवसेनेच्या संघटनात्मक बळात वाढ झाल्याचे चित्र आहे.

आमदार अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात विविध विकासकामांना गती मिळत असून, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य दिले जात आहे. गावांच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न, युवकांना सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी आणि विकासाच्या माध्यमातून परिसराच्या प्रगतीला चालना देण्याच्या भूमिकेमुळे युवकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत असल्याचे या पक्षप्रवेशातून दिसून आले.

युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा एरंडोल नगरपरिषदेतील शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक प्रा. मनोज पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. मान्यवरांनी नवप्रवेशित युवकांचे अभिनंदन करून त्यांना सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या पक्षप्रवेशात उमेश अशोक महाजन, इंद्रनील रोहिदास पाटील, कल्पेश साहेबराव महाजन, दीपक बुधा महाजन, ज्ञानेश्वर लहू महाजन, मनोज इंधा महाजन, रविंद्र उखा महाजन, समाधान शांताराम महाजन, राजू मोहन महाजन, अविनाश तोताराम महाजन, विजय बाबूलाल महाजन, चेतन सुरेश महाजन, दीपक राजेंद्र महाजन, समाधान साहेबराव पाटील, योगेश मनोहर पाटील, महेश विठ्ठल महाजन, योगेश प्रताप महाजन, कल्पेश सुभाष साळुंखे, निलेश पोपट पाटील, सोपान बापू पाटील, सुनील मच्छिंद्र पाटील, अविनाश राजेंद्र महाजन, प्रशांत जयराम महाजन, रोहित सुनील महाजन, प्रेमराज सुखा चौधरी, समाधान रमेश महाजन, भरत धनराज महाजन, परेश सुभाष महाजन, कैलास प्रकाश महाजन, भूषण संजय महाजन, लोकेश रविंद्र महाजन, राहुल भांडारकर, तुषार अनिल मगरे, यशवंत आत्माराम मोरे, गिरीश शिवदास महाजन, संकेत अशोक पाटील, दीपक राजेंद्र चौधरी, शंकर भगवान महाजन, सुदाम संतोष महाजन, शराफत रहीम खाटिक, मुकेश भाईदास महाजन, चेतन लहू महाजन, राहुल अशोक महाजन, अक्षय फकीरा महाजन, राजीव रविंद्र पाटील, ज्ञानेश्वर संजय महाजन, रितेश विजय अहिरे, महेंद्र सुभाष महाजन, निकेतन चंद्रशेखर महाजन, प्रमोद संभाजी महाजन, कमलेश अनिल महाजन, शेखर सुनील महाजन, नरेश दगा महाजन, तात्या कोळी, अशोक कोळी, कृष्णा भिका महाजन आणि कमलेश शामा कोळी यांच्यासह असंख्य युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

विखरण येथील या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यास मदत होणार असून, नव्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावातील सामाजिक उपक्रम आणि विकासकामांमध्ये सक्रिय सहभाग वाढेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button