जळगावमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्येष्ठ नागरिक महिलासंघा तर्फे अधिकमासा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन……

एरंडोल – येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जेष्ठ महिलासंघा तर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सुरुवातीला सानेगुरुजी लिखित “खरा, तो एकाच धर्म” ही प्रार्थना सर्वांनी म्हटली. त्यानंतर अतिथी च्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन दिप  प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सी.एस. पाटीलसर  (ह.भ.प.धरणगांव) हे होते. त्यांनी अधिकमासा निमित्त  महिलांना  बहुमोल मार्गदर्शन केले, अन्नदानाचे महत्व  सांगितले. तसेच प्रमुख पाहुणे ॲड. मोहन शुक्ला  यांनी सुध्दा उपस्थित महिलांना नमन करुन्, मातृशकीला सर्वांनी समजून घेऊन त्यांना श्रेष्ठ मानले पाहिजे असे त्यांच्या मनोगतात सांगितले तसेच मार्च ते में महिन्यात ज्या महिलांचे वाढदिवस होते, त्यांना एपिल में या महिन्यात छोटीशी भेट देऊन, व्यासपिठावर बोलावून  शुभेच्छा देऊन  सन्मानीत करण्यात आले. सरिता रघुवंशी यांनी त्यांना कवितेतून शुभेच्छा  दिल्या
   ज्येष्ठ महिला संघाच्या उपाध्य‌क्षा शकुंतला अहिरराव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला सचिव जैन भामी यांनी त्यांच्या मनोगतातून महिलांचे  प्रबोधन केले, माजी मुख्याधिपिका रोहिणी मानुधने यांनी भजन म्हटले .
प्रास्ताविक जेष्ठ महिला संघाच्या अध्यक्षा शोभा साळी यांनी केले. सूत्रसंचलन  नंदा शुक्ला तर आभार प्रदर्शन खैरनार मॅडम यांनी केले.    आधिकमासानिमित्त स्वादिष्ट भोजन दिल्याबद्दल पपींदर सैनी व सरवन सैनी यांचाही सत्कार करण्यात आला. दानपेटीतील आलेली रक्कम देणगी म्हणून वेले या ठिकाणीअसलेल्या वृद्धाश्रमात देण्यात आली. शेवटी पसायदान इंदिरा पाटील, निता तिवारीनी यांनी म्हटले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारती वारुळे सहित सर्व उपस्थित महिलांनी सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button