जळगावमहाराष्ट्रशेती विषयक

हजारो शेतकऱ्यांना ‘लक्ष्य फाउंडेशन’ची नवसंजीवनीगरजू शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप

प्रतिनिधी एरंडोल : शेतकऱ्यांच्या श्रमाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्यांचा वेळ, श्रम आणि खर्च वाचविण्याच्या उद्देशाने लक्ष्य फाउंडेशनच्या वतीने विखरण व एरंडोल तालुक्यासह पंचक्रोशीतील हजारो गरजू शेतकऱ्यांना मोफत स्वयंचलित इलेक्ट्रिक कृषी फवारणी पंपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सौ. स्मिताताई वाघ होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व संतशिरोमणी सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
लक्ष्य फाउंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष रोशनजी मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे कार्याध्यक्ष व प्रवक्ते किशोरजी आहिरे (चाकण, पुणे) यांनी कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली.
खासदार स्मिताताई वाघ यांच्याकडून कौतुक
खासदार स्मिताताई वाघ यांनी लक्ष्य फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. रोशन मराठे व त्यांच्या सहकाऱ्यांकडून शेतकरी, रुग्ण, दिव्यांग तसेच समाजातील गरजू घटकांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
एरंडोल नगरीचे भूमिपुत्र असलेल्या रोशन मराठे यांनी पुण्यासारख्या शहरात उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवूनही आपल्या मातृभूमीशी असलेली नाळ कायम ठेवली आहे. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते करीत असलेले कार्य गौरवास्पद असल्याचे खासदार वाघ यांनी नमूद केले.
CSR निधीतून शेतकऱ्यांना आधुनिक साधन
या उपक्रमासाठी डॉ. युवराज येडुरे, अध्यक्ष, महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या विशेष सहकार्यातून CSR निधी उपलब्ध झाला. या निधीतून गरजू शेतकऱ्यांना आधुनिक कृषी साधने मोफत उपलब्ध करून देण्यात आली.
कार्यक्रमास नायब तहसीलदार अमोल बन, भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, माजी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, विखरणचे सरपंच गोपाल महाजन, उद्योजक आनंदराव चौथे, डॉ. धनंजय बेंद्रे, ह.भ.प. संजय जमादार, उद्योजक समाधानभाऊ पाटील, बाळासाहेब मोझे, विष्णुआप्पा बाळदे, सुभाष गुंजाळ, खडकेचे सरपंच दीपक राजपूत, खंडूभाऊ गवळी, भाजपा तालुका उपाध्यक्ष दीपक राजपूत, उद्योजक गणेश बडगुजर, पिंपळकोठ्याचे माजी सरपंच दीपक म्हासाळ, बहादरपूरचे माजी सरपंच सोमनाथ चौधरी, आरोग्यदूत पितांबर भावसार, मनोज दादा पेले, उमेशभाऊ पाटील आदी उपस्थित होते.
शिरसोदे, ता. पारोळा येथील आदर्श सरपंच रमेश काशिनाथ सौंदाणे व बहादरपूर येथील समाजसेवक राकेशजी गुरव यांचीही विशेष उपस्थिती होती.
दोन महिन्यांच्या नियोजनातून उपक्रमाला यश
या उपक्रमासाठी उद्योजक राकेश मराठे व लक्ष्य फाउंडेशनच्या कार्यसेवकांनी सुमारे दोन महिन्यांपासून नियोजन केले. विखरण व पंचक्रोशीतील गरजू शेतकऱ्यांची योग्य निकषांच्या आधारे निवड करून पात्र लाभार्थ्यांना कोणताही आर्थिक भार न देता इलेक्ट्रिक फवारणी पंपांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाची वितरण प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. आधुनिक फवारणी पंपामुळे शेतकऱ्यांच्या कामाचा वेग वाढण्यासोबतच वेळ, श्रम व खर्चात बचत होण्यास मदत होणार आहे.
‘शेतकरी हित हाच केंद्रबिंदू’
शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आधुनिक कृषी साधने उपलब्ध करून देण्याचा लक्ष्य फाउंडेशनचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उदाहरण ठरला. शेतकऱ्यांच्या हाताला आधुनिक साधनांची ताकद देऊन त्यांच्या श्रमाला सन्मान मिळवून देणे, हा फाउंडेशनचा संकल्प असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राकेश मराठे, हर्षल पाटील, सम्राट राजपूत, धीरज पाटील, कार्तिक ठाकूर, लोकेश पाटील, निखिल चौधरी, गोरख पाटील, मनोज सोनवणे, सुनील पाटील, सौरभ पाटील, करण पाटील, सुमित मराठे, संदीप पाटील, विनय महाजन, गणेश महाजन व बाला राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले.
हजारो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावत या उपक्रमाला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाबद्दल लक्ष्य फाउंडेशनच्या पदाधिकारी, कार्यसेवक व आयोजकांचे शेतकरी बांधवांकडून कौतुक करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button