एरंडोल नगर वाचनालयास कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी केले ग्रंथदान

एरंडोल : येथील दिडशे वर्षांपासून अव्याहतपणे नगर वाचनालयाची यशस्वी वाटचाल सुरू असून वाचन संस्कृती विद्यार्थ्यांच्या मनात दृढ व्हावी यासाठी वाचनालयाचे नूतन संचालक मंडळ कसोशीने पुढे येत आहे.वक्तृत्व स्पर्धा,वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा,काव्य वाचन स्पर्धा,पुस्तक वाचन स्पर्धा,कवी संमेलने,साहित्य संमेलने या पद्धतीने कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी संचालक मंडळाने पुढाकार घेतलाय.आज सहामाही सर्व साधारण सभेत यावर चर्चा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष मा. जगन्नाथ ठाकूर होते.यावेळी सुप्रसिद्ध कवी तथा वाचनालयाचे कार्याध्यक्ष प्रा.वा. ना.आंधळे यांनी रुपये सव्वीस हजार चारशे दहा किमतीची विविध विषयांवरील पुस्तके वाचनालयास दान केलीत.प्रा.आंधळे यांनी यापूर्वीही विक्रम ग्रंथालय व मोफत वाचनालय धरणगाव यांना तसेच कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धरणगाव येथील ग्रंथालयास प्रत्येकी पंधरा हजार रुपये किमतीचे ग्रंथदान केलेय.त्यांच्या या सत्पात्री दानाचे वाचनालयाचे अध्यक्ष,मा. जगन्नाथ ठाकूर,चिटणीस मा. चिंतामण लाळगे,संचालक सर्वश्री प्रवीण महाजन(पत्रकार),गुरुदास पाटील,परेश बिर्ला,अमोल काबरा, ग्रंथपाल देवेंद्र संतोष वंजारी यांनी अभिनंदन केलेय.





