हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य – नाशिक विभागाच्या सचिव पदी उमेश महाजन यांची निवड

प्रतिनिधी एरंडोल:- हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन महाराष्ट्र राज्य – नाशिक विभागाची स्थापना व पदग्रहण समारंभ नुकताच अपोलो हॉस्पिटल, नाशिक येथे मोठ्या उत्साहात आणि उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला. या कार्यक्रमास हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष मा.धनंजय कणसे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
तसेच एच.एम.ए. राज्य समिती सदस्य मा. अशोक धायगुडे, मा. रावसाहेब साळवे, मा. शसंदीप साळवे, छत्रपती संभाजीनगर येथील ज्येष्ठ पदाधिकारी मा. जनार्दन बाईक तसेच मा. दत्तात्रय कणसे यांची विशेष उपस्थिती होती.
नाशिक शहर व जिल्ह्यातील आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या हेल्थकेअर मार्केटिंग क्षेत्रातील अनेक आरोग्यदूत मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमास नाशिक शहरातील विविध नामांकित रुग्णालयांचे मार्केटिंग प्रतिनिधी योगेश निमसे, सुनील शेवाळे, अक्षय बैरागी, श्री. सोनटक्के सर, सचिन सोनार सर, हिरामण वाघ, निलेश गायकवाड, युवराज राजमाने तसेच ऋषिकेश मुळे सर यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थित सदस्यांनी हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन, नाशिक विभागाची कार्यकारिणी सर्वानुमते निश्चित केली. कार्यकारिणी निवड प्रक्रियेदरम्यान हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशन, नाशिक विभागाच्या अध्यक्षपदी मा. समाधान जाधव यांची तर सचिवपदी मा. महाराष्ट्र भूषण उमेश महाजन यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
याच कार्यक्रमादरम्यान ऋषिकेश गडकरी यांची हेल्थकेअर मार्केटिंग असोसिएशनच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या अनुभवाचा आणि कार्याचा राज्यस्तरावरील संघटनात्मक कामकाजाला निश्चितच लाभ होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी संघटनेच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रातील जनजागृती, रुग्णसेवा, समन्वय आणि व्यावसायिक विकासासाठी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. हेल्थकेअर मार्केटिंग क्षेत्रातील सर्व घटकांना एक सक्षम आणि संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी असोसिएशन कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री. संतोष चौधरी यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी नव्याने स्थापन झालेल्या नाशिक विभागास शुभेच्छा देत संघटनेच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.





