एरंडोलला अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली.

प्रतिनिधी एरंडोल-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार
यांना सर्वपक्षीय पदाधिका-यांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.महाताम
फुले हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित करण्यात आलेल्या शोकसभेत सर्वपक्षीय
पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणी सांगतांना भावनाविवश
झाले होते.
यावेळी माजी आमदार महेंद्रसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांच्या विधानसभेतील आठवणींना उजाळा दिला.राज्याच्या विकासासाठी
प्रयत्नशील असलेल्या अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे त्वरित निर्णय
घेणा-या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला असल्याचे सांगितले.नगराध्यक्ष
डॉ.नरेंद्र ठाकूर,यशवंतराव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अमित
पाटील,माजी नगराध्यक्ष रमेश परदेशी,माजी उपनगराध्यक्ष डॉ.सुरेश
पाटील,सावता माळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय महाजन,जिल्हा
परिषदेच्या माजी सदस्या महानंदा पाटील,निवृत्त तहसीलदार अरुण माळी,बाजार
समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,भाजपचे कायदा आघाडीचे
जिल्हाध्यक्ष advt.मधुकर देशमुख,जगदीश पाटील,शिवसेनेचे तालुकाप्रमुख
रवींद्र जाधव,भाजपचे समाधान पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे advt.अहमद
सय्यद यांचेसह उपस्थित पदाधिकारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या
कार्यपद्धतीबाबत आठवणी सांगतांना भावनाविवश झाले होते.उपमुख्यमंत्री अजित
पवार यांच्यात राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता असतांना देखील त्याना
मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली नाही याबद्दल सर्वच पदाधिका-यांनी खंत
व्यक्त केली.शोकसभेस समन्वय समितीचे माजी अध्यक्ष रमेश महाजन,नगरसेवक
डॉ.नरेंद्र ठाकूर,माजी उपनगराध्यक्ष अशोक चौधरी,जगदीश
ठाकूर,प्रा.आर.एस.पाटील,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आर.डी.पाटील,माजी नगरसेवक
अतुल पाटील,संजय महाजन,अभिजित पाटील,राजेंद्र महाजन,प्रभाकर
पाटील,निवृत्त मुख्याध्यापक बी.वाय.पाटील,दिलीप पांडे,डॉ.राजेंद्र
चौधरी,डॉ.सुधीर काबरा,सचिन विसपुते,दीपक अहिरे,राजेंद्र शिंदे,माजी
सभापती प्रभाकर पाटील,किशोर पाटील यांचेसह विविध सामाजिक,शैक्षणिक
संस्थांचे तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.दत्तू
पाटील यांनी सुत्रसंचलन केले.




