जळगावधार्मिकमहाराष्ट्र

इंद्रदेवजी महाराजा जन्मोत्सव,कार्यक्रम……‌‌!

प्रतिनिधी एरंडोल – खान्देशातील आध्यात्मिक केंद्र असलेल्या सावखेडा येथे सध्या भक्तीचा मळा फुलला आहे. अध्यात्म क्षेत्रातील दीपस्तंभ परमपूज्य सद्‌गुरुदेव महामंडलेश्वर डॉ. संत श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ जयंतीनिमित्त ‘ श्रीमद भागवत कथा ‘ आणि ‘ ५१ कुंडी महालक्ष्मी यज्ञा ‘ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला विशेष ग्लॅमर लाभणार असून प्रसिद्ध खासदार आणि लोकप्रिय गायक मनोज तिवारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
           महाराजजींच्या जन्मोत्सवाचे औचित्य साधून २७ जानेवारी २०२६ पासून या सोहळ्याला प्रारंभ झाला असून, २ फेब्रुवारी २०२६ पर्यंत हा अध्यात्मिक उत्सव सुरू राहणार आहे. महाराजांच्या अमृतवाणीतून दररोज दुपारी १:०० ते ५:३० या वेळेत भाविकांना भागवत कथेचे श्रवण करण्याची सुवर्णसंधी मिळत आहे.परिसर आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी ५१ कुंडांचा भव्य महालक्ष्मी यज्ञ आयोजित करण्यात आला असून यामुळे संपूर्ण सावखेडा परिसर मंत्रोच्चाराने आणि सकारात्मक ऊर्जेने भारून गेला आहे.
           लोकप्रिय लोकनेते आणि गायक मनोज तिवारी हे खास गुरुजींचे आशीर्वाद घेण्यासाठी आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आश्रमात दाखल होणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमुळे भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
        केवळ धार्मिक विधीच नव्हे तर या सोहळ्याच्या माध्यमातून समाजसेवेचाही वसा जपला जात आहे. उत्सवाच्या काळात वृक्षारोपण, आरोग्य शिबिर आणि गौसेवेचे विशेष संकल्प करण्यात आले आहेत.उत्सवाच्या सांगतेला खान्देशातील हजारो भाविकांसाठी भव्य महाप्रसादाचे (भंडारा) आयोजन करण्यात आले आहे.
         “सावखेडा हे महाराजजींचे जन्मस्थान असल्याने या सोहळ्याला भाविकांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. मनोज तिवारी यांच्या आगमनाने या सोहळ्याची शोभा अधिकच वाढणार आहे.”
— आयोजक, आश्रम परिवार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button