जळगावमहाराष्ट्र

एरंडोल येथे ‘ लोहपुरुष ‘ सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी, भव्य रॅली, गुणगौरव व शोभायात्रेने शहर दुमदुमले……..!

प्रतिनिधी एरंडोल – भारताचे लोहपुरुष, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त एरंडोल शहरात ओम नगर, सर्वोदय प्रतिष्ठान व गुजर समाज मंडळाच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांना एरंडोल शहरातील नागरिकांचा व तरुणांचा अभूतपूर्व व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सकाळी ओम नगर येथील श्री ओंकारेश्वर महादेव मंदिराजवळ आणि सर्वोदय प्रतिष्ठान येथे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी युवा शिवसेना जिल्हाप्रमुख तथा गटनेते प्रा. मनोज पाटील, नगरसेवक रविंद्र महाजन, गुजर समाज मंडळाचे अध्यक्ष गोपाल शामू पाटील, प्रा. जी. आर. महाजन, डॉ. नरेंद्र डी. पाटील, माधव पाटील, सदाशिव पाटील, रामदास पाटील, दिनेश महाजन, ॲड. नितीन महाजन, विलास पाटील, भानुदास गुजर, माजी सैनिक कृष्णा महाजन, दिनेश पाटील, दीपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.
सकाळी ८.३० वाजता सर्वोदय प्रतिष्ठान येथून समाजबांधवांच्या भव्य मोटारसायकल रॅलीस जल्लोषात प्रारंभ झाला. ही रॅली भगवा चौक, अमळनेर दरवाजा, नागोबा मढी, महात्मा फुले पुतळा, हायवे मार्ग, धरणगाव चौफुली, ओमनगर मंदिर, बाबासाहेब आंबेडकर पुतळा, महादेव मंदिर, जहागीरपुरा मार्गे गुजर मारोती मढी येथे पोहोचली. या रॅलीत तरुणांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
सकाळी ९.३० वाजता गुजर मारोती मढी येथे सत्कार सोहळा संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, व्यंगचित्रकला क्षेत्रातील योगदानाबद्दल शरद महाजन आणि सामाजिक कार्याबद्दल जितेंद्र पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सरदार पटेल यांच्या कणखर जीवनकार्यावर आणि राष्ट्रउभारणीतील योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनेश महाजन यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र पाटील यांनी केले.आभार प्रदर्शन प्रा. जी. आर. महाजन यांनी केले.
दिवसभराच्या विविध उपक्रमांनंतर सायंकाळी ४.३० वाजता जहांगीरपुरा येथील महादेव मंदिरापासून एका भव्य शोभायात्रेला दिमाखात सुरुवात झाली.संपूर्ण शहरातून निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने गुजर समाज बांधव तसेच शहरातील नागरिक पारंपरिक वषेशभूषेत व उत्साहात सहभागी झाले होते.
हा संपूर्ण जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी चेतन पाटील, हेमंत महाजन, अनंत पाटील, भूषण पाटील, प्रथमेश पाटील, वैभव पाटील, विलास पाटील,भुषण पाटील,दीपक पाटील, योगेश पाटील, मयूर पाटील, दिनेश महाजन, घनश्याम महाजन आणि गुरुदास चौधरी आदी समाजबांधवांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button