एरंडोलच्या आरोग्य दूताचा राष्ट्रीय स्तरावर गौरव; विक्की खोकरे यांना “नॅशनल अवॉर्ड” प्रदान

एरंडोल – एरंडोल येथील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते तथा मानव सेवा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष, आरोग्य दूत श्री. युवराज (विक्की) फकिरा खोकरे यांच्या उल्लेखनीय आरोग्य सेवेची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली.
बॉम्बे ब्लड ऑर्गनायझर इंडिया आयोजित त्यांना नुकत्याच सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे झालेल्या एका दिमाखदार सोहळ्यात स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब कदम यांच्या हस्ते “राष्ट्रीय नॅशनल अवॉर्ड” पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.यावेळी बॉम्बे ब्लड ऑर्गनायझर इंडियाचे अध्यक्ष विक्रम यादव व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
युवराज (विक्की) खोकरे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात केलेले निस्वार्थ आणि अविरत कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.शिर्डी साईबाबा रुग्णालयात सई कडू रुदय पीडित असलेले गरजू रुग्णांना वेळेवर मदत करून त्यांच्यावर यशस्वी शास्त्रकिया करत जीवनदान दिले आहे आरोग्य जनजागृती यासारख्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हा मंत्र जपला आहे.
विशेष बाब म्हणजे भारतातील महाराष्ट्र, राजस्थान, युपी, पंजाब, हरियाणा, कर्नाटक, बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, केरळ ,तामिळनाडू या राज्यातून प्रत्येकी चार समाजसेवकांचा उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याचा सन्मान करण्यात आला.
यात विक्की खोकरे यांचा देखील सेवाभावी कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरस्कार समितीने त्यांची या प्रतिष्ठेच्या पुरस्कारासाठी निवड केली. या सन्मानामुळे एरंडोल तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.




