क्राईमजळगावमहाराष्ट्र

माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांना जीवे ठार मारायचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात औरंगाबाद खंडपीठात आरोपीचा जामीन अर्ज निकाली……….!

प्रतिनिधी एरंडोल – येथील माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांचा अपघात झाल्याचा बनाव करून जीवे ठार मारायचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार वय ४० वर्षे हा तेंव्हा पासून न्यायालयीन कोठडीत आहे.जळगांव सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला असता आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली.फिर्यादी कल्पना दशरथ महाजन यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला हरकत घेतली.न्यायमुर्ती सचिन देशमुख यांच्या न्यायपीठाने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनावणी घेत आरोपी बदकचा जामीन अर्ज निकाली काढला.
       भालगांव शिवारात १२ जुन २०२५ रोजी येथील माजी नगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांना एकटे गाठून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपी बदक उर्फ उमेश सुरेश सुतार ( रा.खोल महादेव, एरंडोल)याने महेंद्रा बोलेरो कारने धडक मारली होती.या घटनेत दशरथ महाजन हे गंभीर जखमी झाले होते.सुदैवाने ते बालबाल बचावले.या घटनेपासून आरोपी बदक न्यायालयीन कोठडीत आहे.जळगांव सत्र न्यायालयाने आरोपी बदक याचा जामीन अर्ज फेटाळला.त्यानंतर आरोपीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी धाव घेतली.फिर्यादी कल्पना महाजन यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला हरकत घेतली.फिर्यादीच्या वतीने ॲड.भुषण महाजन यांनी आरोपी बदक यास कोल्हापूर सत्र न्यायालयाने खुनाच्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा ठोठावल्याचे तसेच नंदगाव फाटा खून प्रकरण, म्हसावद नाका मारहाण प्रकरण, अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण, तुरूंगातील इतर कैद्यांना केलेली मारहाण प्रकरण, कारागृहातून पळून गेल्याचे प्रकरण इत्यादी महत्वाचे दस्तावेज न्यायालयासमोर सादर केले असता आरोपी बदकने जामीन अर्जच मागे घेतला.न्यायमुर्ती सचिन देशमुख यांच्या न्यायपीठाने ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सुनावणी घेत आरोपी बदकचा जामीन अर्ज निकाली काढला.फिर्यादीच्या वतीने ॲड.भुषण महाजन यांनी कामकाज पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button